गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. मीरारोड परिसरात अमराठी व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याने मराठी-अमराठी संघर्ष वाढला आहे. सोशल मीडियावर मराठी लोकांकडून अमराठी लोकांना मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रितेश देशमुखच्या मराठी संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रील्स स्टार पुनीतने त्याला सुनावलं. यावर ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवारने पुनीतला प्रत्युत्तर दिलं आहे.