अभिनेते आणि निवेदक आदेश बांदेकर यांनी ‘होम मिनिस्टर’ या शोमधून लोकप्रियता मिळवली. एकेकाळी दहावीत कमी टक्के मिळाल्याने ते नैराश्यात होते आणि आत्महत्येचा विचार करत होते. मात्र, त्यांच्या वडिलांनी पेढे वाटण्याची अनोखी शिकवण देऊन त्यांना धैर्य दिलं. आज ते यशस्वी निर्माते आहेत. अलीकडेच त्यांनी ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.