कॅनडाच्या टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याच्या घटनेमुळे केंद्र सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे नाराजी व्यक्त करत त्वरीत कारवाईची मागणी केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. रथयात्रेवर अंडी फेकल्यामुळे भारतीय समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.