राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील आदर्श विद्या मंदीर शाळेत ९ वर्षांच्या प्राची कुमावत हिला मधल्या सुट्टीत खाऊचा डबा उघडताना हृदयविकाराचा झटका आला आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. शाळेचे मुख्याध्यापक नंद किशोर यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. प्राचीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु तिचा मृत्यू झाला.