बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी ‘खुदा गवाह’ चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबर काम केल्याचा अनुभव शेअर केला. त्यांनी अमिताभ यांच्या कामातील ऊर्जा आणि शिस्तबद्धतेचं कौतुक केलं. किरण कुमार म्हणाले की, अमिताभ यांच्याबरोबर काम करणं म्हणजे व्हायरसबरोबर काम केल्यासारखं आहे, कारण त्यांच्या कामातील ऊर्जा आपसूकच तुमच्यात येते.