गेल्या दोन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याची चर्चा आहे. गायकवाड यांना काळे फासण्यात आले, शाई ओतण्यात आली आणि धक्काबुक्की करण्यात आली. विधानसभेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली. हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.