झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आता निर्मातेही झाले आहेत. शिक्षणात कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्याचा सामना त्यांनी वडिलांच्या सहकार्याने केला. दहावीत ३७ टक्के मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि सध्या Ph.D. करत आहेत. नुकताच त्यांनी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम केला.