लोकप्रिय पंजाबी अभिनेता व गायक दिलजीत दोसांझने ‘सरदारजी ३’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला घेतल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही हानियाला घेतल्याबद्दल अनुपम खेर यांनीही दिलजीतवर टीका केली. खेर म्हणाले, “मी दिलजीतच्या जागी असतो तर असा निर्णय घेतला नसता.” वादानंतर निर्मात्यांनी चित्रपट भारतात न दाखवण्याचा निर्णय घेतला.