कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातील जंगलात रशियन महिला नीना कुटीना तिच्या दोन मुलींसह राहात असल्याचे पोलिसांना आढळले. २०१७ मध्ये भारतात आलेली नीना अध्यात्मिक साधनेसाठी जंगलात राहू लागली. तिचा व्हिसा २०१७ मध्येच संपला होता. पोलिसांनी तिला समजावून जंगल सोडायला लावले आणि शंकरा प्रसाद फाऊंडेशनच्या ताब्यात दिले. १४ जुलैला तिला रशियात परत पाठवले जाईल.