गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. हिंदी सक्तीबद्दल अनेक मराठी आणि बॉलीवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आर. माधवननेही भाषेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, तामिळ भाषिक असूनही हिंदी आणि मराठी शिकल्यामुळे त्याला कधीच अडचण आली नाही. नुकताच त्याचा ‘आप जैसा कोई’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.