कर्नाटकचे निवृत्त डीजीपी ओम प्रकाश यांची हत्या त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी केली आहे. पल्लवी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पल्लवी यांनी पत्रकारांना पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांनी ओम प्रकाश यांच्या एजंट्सकडून पाळत ठेवली जात असल्याचा आणि विषबाधेचा आरोप केला आहे. तसेच, ओम प्रकाश पीएफआयचा सदस्य असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.