scorecardresearch

अजित पवार News

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
Trial of fourstation metro line on Ghodbunder line
thane metro : ठाण्याच्या मेट्रो चाचणीदरम्यान भाजपाचा जोर तर, शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक फिरलेच नाही

शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक फिरलेच नसल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजीत पवार) पक्षाचे नेते…

Dhananjay Munde to Sunil Tatkare
“मला रिकामं ठेवू नका, काही चुकलं असेल तर…”, धनंजय मुंडेंची भर सभेत सुनील तटकरेंना विनंती

Dhananjay Munde to Sunil Tatkare : राष्ट्रवादी (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा आज (२२ सप्टेंबर) कर्जत (रायगड)…

ajit Pawar suggests alternative routes for Bhakti Shakti Marg metro
हिंजवडी आयटी पार्क आणि चाकणची वाहतूक कोंडी फुटणार… अजित पवार यांचे नव्याने निर्देश

महामेट्रोकडून हाती घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील भक्ती-शक्ती मार्गावरील मेट्रो मार्गिका तळवडेपासून पुढे चाकणच्या एमआयडीसीपर्यंत नेण्यात येणार आहे. चाचपणी करून पर्यायी…

Girish Mahajans statement in Nashik
नाशिकचे पालकमंत्री करा किंवा करू नका… गिरीश महाजन असे का म्हणाले ?

मित्रपक्षांच्या विरोधामुळे औट घटकेचे पालकमंत्री ठरलेल्या महाजन यांनाही आता पालकमंत्री करा अथवा करू नका… हे सांगण्याची वेळ आली आहे.

Maharashtra Breaking News Today Live
Maharashtra News Update : धाराशिव, बीड आणि जालन्यात जोरदार पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

Mumbai News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

ajit pawar
महापालिका निवडणूक कधी होणार? युती होणार का? अजित पवार म्हणाले, ‘ज्योतिषी’…

‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल,’…

ajit Pawar anger on maharashtra attacks
पिंपरी- चिंचवड: महाराष्ट्रातील हल्ल्यांच्या घटनांविषयी अजित पवार संतापले; “या घटना महाराष्ट्राला…”

महाराष्ट्रात होणाऱ्या हल्ल्याच्या घटना महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत.अशा घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…

ncp Ajit Pawar only one MLA in nanded district
नांदेडमध्ये ‘राष्ट्रवादी’चा आमदार एक; पण माजी अनेक ! नांदेड जिल्ह्यातील चित्र

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाचा नांदेड जिल्ह्यात एकच आमदार असला, तरी या पक्षात माजी आमदार अनेक असे चित्र झाले…

pune ajit Pawar meeting with Pune mahametro director DPR
पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्रोच जाळं उभारणार; कुठल्या भागातून मेट्रो जाणार?,अजित पवारांची महामेट्रोसोबत बैठक..

भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या डीपीआर बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली

BJP NCP clash Maval politics local body elections strategy Sunil Shelke Bala Bhegade
मावळमध्ये भाजप-अजित पवार गटात जुंपली प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी’च्या काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील प्रवेशावरून आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

ajit pawar promises cultural funding rural theatre halls pimpri chinchwad ranganubhuti festival
सांस्कृतिक क्षेत्राला आर्थिक पाठबळ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सवाचे शनिवारी…

ताज्या बातम्या