scorecardresearch

अजित पवार Photos

अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक दिग्गज राजकारणी होते. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकीय कारकिर्दीत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते. त्यांनी याआधी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ या काळातदेखील दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. अजित पवार हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आले होते. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव होता.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार पक्षातील बहुसंख्य आमदार व खासदारांसह सत्ताधारी महायुतीचा घटक झाले. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराचे आरोप यामुळेदेखील चर्चेत राहिली. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये त्यांचं अकाली निधन झालं.


Read More
Parth Pawar Kayinaat Dara Engagement Wedding Date
12 Photos
Photos: पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली! होणाऱ्या पत्नीबरोबरचं पवार कुटुंबाचं खास फोटोशूट चर्चेत

येत्या २९ जुलै २०२६ रोजी पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा अतिशय साध्या व कौटुंबिक वातावरणात, केवळ मोजक्याच नातेवाईक…

Ajit Pawar Birth Anniversary Statue Photo Exhibition
9 Photos
Photos: “दादांचा जिवंत वारसा…” बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे आणि छायाचित्र प्रदर्शनाचे अनावरण

नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्र…

Jay Pawar on Ajit Pawar
9 Photos
वडील म्हणून अजित पवार कसे होते? जय पवार म्हणाले “दादा खूप कठोर आणि …”

शिस्तप्रिय स्वभावामागे लपलेलं मुलांवरील अथांग प्रेम; जय पवार यांनी जयंतीनिमित्त व्यक्त केल्या वडिलांच्या आठवणी.

Ajit Pawar Birth Anniversary Family Pays Respects
9 Photos
अजित पवारांच्या जयंतीनिमित्त पवार कुटुंबीयांनी वाहिली आदरांजली; सुनेत्रा पवारांनी शेअर केले फोटो

Ajit Pawar Birth Anniversary: सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, जनसेवेची तळमळ आणि विकासाचा वारसा आपल्याला…

Ajit Pawar Birth Anniversary Jay Pawar Emotional Post
9 Photos
Photos: अजित पवारांसाठी जय पवारांची भावुक पोस्ट; “दरवर्षी तुमच्या वाढदिवशी रात्री १२ वाजता…”

“आजही त्याच क्षणी, मी तुमच्या स्मृतीस्थळी हात जोडून उभा होतो… मनात तेच प्रेम आणि आदर होता, पण तुमच्या नसण्याने निर्माण…

Rajendra Pawar Shared Old Photos Of Ajit Pawar
12 Photos
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बंधू राजेंद्र पवार यांनी शेअर केले जुने फोटो; म्हणाले, “रोहित दोन महिन्यांचा होता…”

“मनापासून तुझी आठवण येतेय. तुझे अस्तित्व नेहमी जाणवत राहते… ‘काय बंधू!’ अशा तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहत राहते.”

Sunetra Pawar Baramati Election Record Break
12 Photos
सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयी; अजित पवार यांचा २०१९चा विक्रम केला आपल्या नावावर

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करण्यात आले, मात्र २२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार…

Yugendra Pawar Shares Photos Pays Tribute to Ajit Pawar
9 Photos
अजित पवार यांच्या निधनाला तीन महिने पूर्ण; युगेंद्र पवारांकडून स्मृतीस्थळी भावपूर्ण आदरांजली

अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे १९९५ ते २०२४ या प्रदीर्घ कालावधीत सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले होते.

ताज्या बातम्या