scorecardresearch

अजित पवार News

अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.


अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.


१९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.


पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते.


२०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.


अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


 


Read More
jitendra awhad narendra modi marathi news, jitendra awhad ajit pawar marathi news
“मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे हे पटते का?”, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना सवाल

महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Eknath Shinde and Ajit Pawar group will not get a single Lok Sabha seat says Sachin Sawant
लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा

निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन…

supriya sule ajit pawar (3)
राष्ट्रवादीतील घराणेशाहीबाबत विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हो बरोबरच आहे, मी आणि अजितदादा…”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वाय. बी. सेंटरवरच्या सर्व बैठकांना मी नसते, पण शरद पवार उठून गेले असं कुठल्या बैठकीत घडल्याचं मला…

What Ajit Pawar told About Sharad Pawar
‘२०१९ ला भाजपासह जायचं शरद पवारांनी कसं ठरवलं होतं?’ अजित पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी

२०१७ आणि २०१९ या वर्षांत पडद्यामागे काय घडलं? अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Devendra Fadnavis On PM Modi
“मोदी है तो मुमकिन है, पुढे काय काय होतं ते पाहा”; देवेंद्र फडणवीस यांचा रोख कुणाकडे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला.”मोदी है तो मुमकिन है, काय काय होतं ते पुढे पाहा”, असे…

Sanjay raut, ajit pawar, Sanjay raut criticize ajit pawar, shrirang barne campaign, ajit pawar shrirang barne campaign, parth pawar, ncp ajit pawar, shivsena uddhav Thackeray, mahayuti, maha vikas aghadi, lok sabha 2024, election 2024,
….अन तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील- संजय राऊत

मावळ लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी प्रचार करत आहेत. यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे…

after month BJP and NCP active in campaigning in Maval Ajit Pawar and Parth Pawars attention on every development
पिंपरी : अखेर महिनाभरानंतर मावळमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात सक्रिय; प्रत्येक घडामोडीवर अजित पवार, पार्थ पवारांचे लक्ष

मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा करूनही मतदारसंघ मिळाला नसल्याने नाराज झालेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखेर महिनाभरानंतर सक्रियपणे महायुतीचे उमेदवार खासदार…

shirur lok sabha 2024 marathi news
अमोल कोल्हेंना गावकऱ्यांचा विरोध! आढळराव म्हणाले, “कोल्हेंना तोंड दाखवायला…”

शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत आहे.

ताज्या बातम्या