scorecardresearch

अजित पवार Photos

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
ajit pawar education details
9 Photos
Ajit Pawar Birthday: अनेकांची शाळा घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार कितवी पास आहेत? बारामती, गिरगाव ते कोल्हापूर; कुठे झालंय शिक्षण?

Deputy CM Ajit Pawar Birthday: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस, यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या शिक्षणाबद्दल…

PM Modi Extends Birthday Wishes to Devendra Fadnavis and Ajit Pawar
8 Photos
पीएम मोदींकडून देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; काय म्हणाले? वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा…

Ajit Pawar Birthday Wife Sunetra Pawar Post Viral
10 Photos
Photos: ‘मी पत्नी म्हणून कायमच…’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवार यांनी दिल्या खास शुभेच्छा

अजित पवार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि वेगाने केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.

Sunetra Ajit Pawar Mangalsutra Design
12 Photos
Photos: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का?

सुनेत्रा पवार २०२४ पर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या.

Nirmala Shubham Nawale New Car
10 Photos
Photos: कारेगावच्या सरपंचांनी खरेदी केली इतक्या लाखांची गाडी? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

President NCP Yuvati Maharashtra: निर्मला यांच्या कडे ‘कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र राज्य’ हे पद आहे.

astrophysicist Jayant Narlikar funeral at vaikunth crematorium state honours vaikunth crematorium photos
9 Photos
Photos: पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. जयंत नारळीकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dr. Jayant naralikar funeral : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अत्यंसस्कार…

Dahisar East And Kashigaon Metro Photos
9 Photos
Mumbai Metro Line 9 Photos: मुंबईच्या प्रवासाचा नवा टप्पा; मेट्रो धावणार आता मिरा-भाईंदर पर्यंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात झाली.

Jay Ajit Pawar Rutuja Patil Engagement Photos
12 Photos
Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो

Jay Ajit Pawar Rutuja Patil Engagement: मागच्या काही वर्षांपासून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची ओळख आहे.

Dhananjay Munde Net Worth, Dhananjay Munde property
9 Photos
माजी मंत्री धनंजय मुंडे यांची संपत्ती किती? कार्स, सोनं आणि एकूण मालमत्तेबद्दल जाणून घ्या…

Dhananjay Munde Net Worth : २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे एकूण २३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं होतं.

Rekha Gupta Takes Oath As Delhi chief minister Parvesh verma and these 5 MLAs also took the oath for cabinet minister
15 Photos
अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या मंत्रिमंडळात, पार पडला शपथविधी सोहळा!

दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

ताज्या बातम्या