scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अजित पवार Videos

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
Deputy Chief Minister Ajit Pawars reaction to Manoj Jaranges protest
Ajit Pawar on Jarange Protest: चर्चेतून मार्ग निघेल, जरांगेंच्या आंदोलनावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. दरम्यान न्यायालयाकडून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला…

As soon as Deputy Chief Minister Ajit Pawar came to give a speech the worker said
Ajit Pawar: अजित पवार भाषण करायला येताच कार्यकर्ता म्हणाला, “love you”

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम कोल्हापुरात पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री…

ajit pawar gave a speech in pune
Ajit Pawar in Pune: डाॅक्टर हे बागणं बरं नव्हं…; अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी

पुण्यात आज एका डोळ्यांच्या दवाखान्याचं उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून अजित पवारांनी केलेल्या…

Why did Sunetra Pawar Was Present At RSS Event at Kangana Ranauts House
सुनेत्रा पवारांची RSS च्या कार्यक्रमाला उपस्थिती; अजित पवार म्हणतात, “माझ्या बायकोला फोन करतो नी..”

Why did Sunetra Pawar Was Present At RSS Event at Kangana Ranaut’s House: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी…

Ajit Pawar and Devendra Fadnavis travel together in an electric car in pune
Ajit Pawar & Devendra Fadnavis: इलेक्ट्रिक गाडीतून अजित पवार आणि फडणवीसांचा एकत्रित प्रवास

पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील उड्डाणपुलाचं उदघाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात…

मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा अजित पवारांनी कंट्रोल रूममधून घेतला आढावा |
मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा अजित पवारांनी कंट्रोल रूममधून घेतला आढावा |

मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा अजित पवारांनी कंट्रोल रूममधून घेतला आढावा | Ajit Pawar

Monorail suddenly shuts down in Mumbai Ajit Pawar gave a reaction
Ajit Pawar: मुंबईत मोनोरेल अचानक बंद पडली; अजित पवार म्हणाले, “कॅपेसिटीपेक्षा जास्त…”

Ajit Pawar: चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील मोनोरेल गाडी मंगळवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि मोठ्या संख्येने प्रवासी…

Ajit Pawar gave a reaction on the vote theft issue
Ajit Pawar on Vote Choti: ‘व्होटचोरी’ प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

काँग्रेससह इंडिया आघाडीने उचलून धरलेल्या व्होट चोरीच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. सगळीकडे मताची संख्या वाढत असते…

ताज्या बातम्या