भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा असून नागपूरच्या पश्चिमेस वसले आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. येथील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. याचबरोबर हा जिल्हा तळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४८ लहान मोठी तळी आहेत. गवळी राजवटीतील खांब तलावही भंडारा जिल्ह्यात आहे. येथे वैनगंगा नदीवर वसलेला इंदिरासागर हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे असून येथे मॅंगनीज आणि क्रोमाईटच्या खाणी आहेत. तसेच मँगनीज शुद्धीकरण कारखानाही येथे आहे. तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योगही भंडारा जिल्ह्यात आहे. Read More
२०२४-२५ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक आल्यानंतर महापालिका प्रशासनाने २०२५-२६ मध्ये देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी आतापासूनच…
काही दिवसांपूर्वी लाखनी तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील डॉक्टराचे एका तरुणीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता भंडाऱ्यातील एका…
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावापासून १५ किमी अंतरावर असलेल्या खांबाडी शेत शिवारातील नाल्यात मासे पकडण्यासाठी एका व्यक्तीने जाळे लावून ठेवले होते.…