scorecardresearch

छगन भुजबळ News

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj News
शांतीगिरी महाराजांचा शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज? छगन भुजबळ म्हणतात, “नाशिकच्या जागेवर…”

नाशिक मतदारसंघात अचानक ट्वीस्ट आला आहे. शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे.

Voter Sympathy, Voter Sympath gain crowd in public meeting, Chhagan Bhujbal, sharad pawar, Chhagan Bhujbal said Voter Sympathy will not win Election, nashik lok sabha seat, lok sabha 2024, elction campaign, mahayuti seat allocation,
सहानुभूतीमुळे शरद पवार यांच्या सभांना गर्दी – छगन भुजबळ यांचे मत

अनेक जण हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असल्याने…

Chhagan Bhujbal On Manoj Jarange
“मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते”; छगन भुजबळ यांचा खोचक टोला

मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील…

Chhagan Bhujbal on Uddhav Thackeray
‘उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याप्रती लोकांमध्ये सहानुभूती’, छगन भुजबळ याचं आश्चर्यजनक विधान

छगन भुजबळ यांनी बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीवरही भाष्य केले.

ajit pawar NCP, Nashik Lok Sabha Seat, lok sabha 2024, NCP Seat Demands Allocation in mahayuti, nashik lok sabha 2024, lok sabha 2024, bjp, eknath shinde shivsena, chhagan bhujbal,
नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क – अजित पवार गटाचा ठराव

महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ राष्ट्रवादीनेच सोडवून घेतला पाहिजे, असा ठराव राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत करण्यात…

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
‘लय फडफड करत होता’; मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून मनोज जरांगे यांनी…

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना प्रीतम मुंडे यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता…

Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला,…

Eknath Shinde, Shirur s candidature, Chhagan Bhujbal, amol kolhe, shirur lok sabha seat, shivaji adhalrao patil, lok sabha 2024, election campagin, marathi news, shirur news, sharad pawar ncp, ajit pawar ncp,
शिरूरची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंचा होता पण… – अमोल कोल्हे

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला…

Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…

दिल्लीत गेल्यावर ओबीसींचे राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून ओळख प्रकर्षाने पुढे येईल अशी भुजबळ यांची अटकळ आहे. आताही देशभरात ते ओबीसींच्या…

Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha
महायुतीत नाशिकचा तिढा सुटेना, आता छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “आमचा दावा…”

नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, यासाठी समता परिषदेने ठराव केला. यानंतर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या…

ताज्या बातम्या