scorecardresearch

छगन भुजबळ Videos

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Criticizing Narendra Nodi angered Chhagan Bhujbal on Jarange patil
Chhagan Bhujbal on Jarange: “बेडकासारखं फुगायचं…”, मोदींवरच्या टीकेवरून भुजबळ जरांगेंवर संतापले!

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. “जरांगे…

chhagan bhujbals response on manoj jarange patils criticism
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: जरांगेंच्या टीकेवर भुजबळांचं प्रत्युत्तर

मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावर अन्न व नागरी…

chhagan Bhujbals defiance in the Grand Alliance Jayant Patil gave a reaction
Jayant Patil on Chhagan Bhujbal: “भुजबळांची महायुतीत अवहेलना”; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ हे शरद पवार गटात येण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी…

Big secret explosion of Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha Constituency
Chhagan Bhujbal on Nashik Loksabha: नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच…

minister chhagan bhujbal on hemant godse
“हेमंत गोडसेंनी जागा सोडली तर, विचार करता येईल”,भुजबळांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण | Bhujbal

“हेमंत गोडसेंनी जागा सोडली तर, विचार करता येईल”,भुजबळांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण | Bhujbal

ताज्या बातम्या