scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हॉलीवूड Videos

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More