scorecardresearch

कोयना धरण News

महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोयना नदीला म्हटले जाते. या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी १९६४ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या जलाशयाच्या काठावर कोयना अभयारण्य आहे. या धरणाची उंची १०३.२ मी (३३९ फूट) तर लांबी ८०७.२ मी (२,६४८ फूट) इतकी आहे. या धरणाचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती यांसाठी केला जातो. २७९७.४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाची वीज निर्माण करण्याची क्षमता १,९२० मेगाव्हॉट इतकी आहे. १९६९ मध्ये झालेल्या कोयनानगर भूकंपाने या धरणाला काही भेगा पडल्या होत्या. तेव्हा झालेले नुकसान भरुन काढण्यात आले. १९७३ मध्ये धरणाचा ओव्हरफ्लो नसलेला भाग तयार करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये स्पिलवे विभाग मजबूत करण्यात आला. आता हे धरण भविष्यामध्ये १९६९ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपजन्य परिस्थितीचा सामना करु शकते असे म्हटले जाते.Read More
Cleaning and excavation on Krishna Ghat begins, Karad Municipality administration ordered to take action
कराडच्या कृष्णा घाटावरील पुरातन बुरुज पुन्हा उजेडात; बुरुजांभोवतीची माती व वाळू हटवण्याचे काम सुरू

काळाच्या ओघात हे बुरुज गाळ, माती व वाळूने पूर्णपणे झाकले गेल्याने ते लोकांच्या नजरेआड झाले होते. मात्र, एका जागरूक नागरिकाच्या…

koyna dam victims
कोयना प्रकल्पग्रस्तांचा शिवसागर जलाशयाकाठी संसार, मायभूमीत मेलो तरी चालेल पण न हलण्याचा इशारा

महाबळेश्वर, जावली तालुक्यातील जंगलातच असलेल्या आपल्या मूळ गावठाणात त्यांनी आपला संसार पुन्हा थाटला आहे.

कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना

सन २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे राज्यात नवीन मंत्रीमंडळ अस्तित्वात आले असल्याने कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीच्या कार्यकारिणीची पुर्नरचना…

cable bridge work in progress Koyna dam backwaters boost for tourism development
कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर, पर्यटन विकासाबरोबरच दुर्गम भागातील दळणवळणही सुधारणार

या पुलाच्या बांधकामामुळे दुर्गम कांदाटी खोरे जोडले जाणार आहे. कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिर रस्ता जोडला जाणार असून, यामुळे या भागातील…

Exhibition of tricolor laser show at the gates of Koyna Dam on the occasion of Independence Day 2024
कोयनेच्या संडव्यावरून पाणी वाहते करून त्यावर तिरंगा ‘लेसर शो’चे नयनरम्य प्रदर्शन

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळपासून कोयना धरणाच्या दरवाजांवर देशप्रेम व्यक्त करणारा तिरंगा ‘लेसर शो’चे नयनरम्य प्रदर्शन धरण व्यवस्थापनाने साकारले आहे. त्यास…

shivpratap roro ferry service begin in shivsagar reservoir by satara district council
शिवसागर जलाशयात शिवप्रताप तराफा दाखल; कोयनेतील दळणवळण होणार सोयीचे; संभाजी शिंदेंच्या हस्ते पूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते या तराफ्याची चाचणी घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली.