scorecardresearch

कोयना धरण Photos

महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोयना नदीला म्हटले जाते. या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी १९६४ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या जलाशयाच्या काठावर कोयना अभयारण्य आहे. या धरणाची उंची १०३.२ मी (३३९ फूट) तर लांबी ८०७.२ मी (२,६४८ फूट) इतकी आहे. या धरणाचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती यांसाठी केला जातो. २७९७.४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाची वीज निर्माण करण्याची क्षमता १,९२० मेगाव्हॉट इतकी आहे. १९६९ मध्ये झालेल्या कोयनानगर भूकंपाने या धरणाला काही भेगा पडल्या होत्या. तेव्हा झालेले नुकसान भरुन काढण्यात आले. १९७३ मध्ये धरणाचा ओव्हरफ्लो नसलेला भाग तयार करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये स्पिलवे विभाग मजबूत करण्यात आला. आता हे धरण भविष्यामध्ये १९६९ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपजन्य परिस्थितीचा सामना करु शकते असे म्हटले जाते.Read More

ताज्या बातम्या