scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लक्ष्मण हाके News

लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत. २००३ साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी उसतोडणी कामगार म्हणूनही काम केलं. त्यांच्या पत्नी विद्या हाके या सध्या पुण्याच्या व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. लक्ष्मण हाके यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पुढे ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत माढा मतदारसंघातून धर्यैशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. लक्ष्मण हाके यांना जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.


Read More
Laxman Hake
“सरकारला झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही…”, लक्ष्मण हाकेंचा इशारा; लाँगमार्च, संघर्षयात्रा, उपोषणासह वेगवेगळी तयारी

Laxman Hake : लक्ष्मण हाके म्हणाले, बऱ्याचदा भटक्या विमुक्तांना जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहा महिने लागतात आणि इथे सरकारच जातप्रमाणपत्र वाटत आहे.

laxman hake agitation at girgaon chowpatty
‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांचे गिरगाव चौपाटीवर आंदोलन

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेकडून विद्यावेतन व अधिछात्रवृत्ती दिली जाते.

obc leader laxman hake latest news in marathi
Laxman Hake: उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून ‘महाज्योती’ला दुय्यम वागणूक, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप

‘महाज्योती’च्या संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछत्रवृत्ती देण्यास यांच्याकडे निधी नाही, ही लाजिरवाणी बाबत आहे, असा टोलाही हाके यांनी लगावला.

Laxman Hake
“अन्यथा लक्ष्मण हाकेंना निपटवू”, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Prashant Pawar on Laxman Hake : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्या नांदेडमधील वक्तव्याचा निषेध नोंदवला…

laxman hake calls jarange mad alleges ten lakh donation by politicians
…त्यांची रायगड प्राधिकरणावरून हकालपट्टी करा, लक्ष्मण हाके यांची मागणी

रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करण्यात यावी,’ अशी मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केली.

Laxman Hake On Manoj Jarange Patil MLA Suresh Dhas
Lakshman Hake : “संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य…”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे अन् सुरेश धसांवर हल्लाबोल

Lakshman Hake : आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भाष्य करत मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Laxman Hake, Chhagan Bhujbal And Ajit Pawar.
Chhagan Bhujbal : भुजबळांना उपमुख्यमंत्री करणार का? मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना सवाल

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

laxman hake loksatta marathi news
छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करा – ओबीसी नेते लक्ष्मण हाके

विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सभासद म्हणून छगन भुजबळ असून त्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले. त्यामागे नेमकी कोणती कारणे होती. याबाबत अजित…

Lakshman Hake OBC Leader wants Cabinet ministers
Lakshman Hake : आधी कॅबिनेट पदाची मागणी, मग लक्ष्मण हाके म्हणतात, “मला विधान परिषदेबद्दल” फ्रीमियम स्टोरी

“एकनाथ शिंदेंनी १० टक्के आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. पण जरांगेंना ते कळलं नाही. ते पवार साहेब, टोपे साहेब, रोहित साहेब…