scorecardresearch

महाराष्ट्र सरकार News

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
Project affected group to stage unique Nandgaon Tekdi protest over Navi Mumbai airport naming and jobs
पनवेल: विमानतळाच्या नामकरणासाठी डोंगरावरून सरकारला हाक

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून देखील अद्याप नामकरणाबाबत केंद्र…

Raj Thackeray criticizes Independence Day meat ban says government snatching away food freedom
सरकार लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप

कबुतरांच्या नावाखाली राजकारण करताना मंगलप्रभात लोढा यांनी ते राज्याचे मंत्री आहेत, एका समाजाचे मंत्री नाहीत याचे भान ठेवावे असा इशाराही…

balasaheb throat on chhagan Bhujbal displeasure in mahayuti
छगन भुजबळ खूप अवहेलना सहन करताहेत… बाळासाहेब थोरात असे का म्हणाले ?

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कथित नाराजीवर बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, महायुती सरकारमध्ये भुजबळ यांना खूप…

onion subsidy Maharashtra news
साडेचौदा हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांचे कांदा अनुदान

नाफेडला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने…

ration shops margin per quintal increased
रास्त भाव दुकानदारांना क्विंटलमागे १५० ऐवजी १७० रुपये, अतिरिक्त मोबदल्यात सरकारकडून २० रुपये वाढ

या वाढीमुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे १५० रुपयांऐवजी १७० रुपये अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.

Police constables Recruitment in 2025
राज्यात १५ हजार पोलिसांची भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही विशेष बाब म्हणून संधी

२०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबरोबरच २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ…

bhandara mantralaya loksatta
मिनी मंत्रालयातील शासकीय वाहनांच्या चाकांची चोरी, भंडारा जिल्ह्याचा कारभार हाकणारी यंत्रणाच असुरक्षित!

भंडारा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे इमारत व परिसरात पुर्णतः दुर्लक्ष होत असून नव्या अधिकाऱ्यांना मिनी मंत्रालय डोकेदुखी ठरत आहे.

navodaya school proposal sent to thane collector
ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय उभे राहण्याच्या हालचाली सुरु; जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

नवोदय विद्यालयासाठी शहापूरच्या भातसानगरमधील सहा हेक्टर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

The sword won by the Maharashtra government at an auction will arrive in Mumbai on August 18
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ताब्यात; १८ ऑगस्टला मुंबईत दाखल : आशिष शेलार

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ही तलवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल…