scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महाराष्ट्र Photos

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Electricity Smart Meter Benefits
10 Photos
Photos: स्मार्ट मीटर अनिवार्य होणार? स्मार्ट मीटर म्हणजे काय, त्याचा फायदा काय होणार?

या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही. हे मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याचेच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास…

HSRP Number Plate
9 Photos
HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

HSRP Number Plate: राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्साठी अवघे काही दिवस शिल्लक, अन्य़था दंड भरावा लागेल.

Red Soil Stories Shirish Gavas Information
12 Photos
Photos: ‘रेड सॉइल स्टोरीज’ फेम शिरीष गवसचं दुःखद निधन; त्यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

मुंबईतील नोकरी सोडून कोकणात वसलेल्या या जोडप्याने गावाकडील खाद्यसंस्कृती, सण व उत्सव जगासमोर आणले आहेत.

Ajit Pawar Birthday Wife Sunetra Pawar Post Viral
10 Photos
Photos: ‘मी पत्नी म्हणून कायमच…’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवार यांनी दिल्या खास शुभेच्छा

अजित पवार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि वेगाने केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.

Devendra Fadnavis Shri Vitthal Rukmini Mahapooja
12 Photos
Ashadhi Ekadashi 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; पाहा गाभाऱ्यातील फोटो

महापूजेनंतर फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना केली.

ताज्या बातम्या