scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मनोज जरांगे पाटील News

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
jarange assures reservation for all marathwada marathas
“मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयात गरज असल्यास बदल करू”, विखे-पाटलांनी शब्द दिल्याचा मनोज जरांगेंचा दावा

शासनाच्या निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तो करून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (छायाचित्र सोशल मीडिया)
ओबीसी महासंघाने उधळला गुलाल, देवेंद्र फडणवीसांनी केलं जीआरचं विश्लेषण; दिवसभरात काय घडलं?

Todays Top Political News : आज दिवसभरात महाराष्ट्रापासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक महत्वाच्या राजकीय घडमोडी घडल्या. त्यातील पाच महत्वांच्या घडामोडींचा…

OBC federation protest
OBC Protest : सर्वच मराठ्यांना आरक्षण नाही… मंत्री अतुल सावेंची भूमिका

Atul Save on Maratha Reservation : राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून इतर बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय…

Manoj Jarange Patil's Maratha Reservation Protest
“दक्षिण मुंबईत आंदोलने करण्यास बंदी घाला”, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शिंदे गटाच्या खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Manoj Jarange Patil’s Protest Azad Maidan: मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले…

Devendra Fadnavis
“…केवळ त्यांनाच लाभ मिळेल”, फडणवीसांकडून सरकारच्या GR चं विश्लेषण; मराठा आरक्षणाबाबत म्हणाले…

Devendra Fadnavis on Hyderabad Gazetteer : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले नाहीत. त्यांची व…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (छायाचित्र फेसबुक)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना कसं शांत केलं?

Devendra Fadnavis on Manoj jarange Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळीच तोडगा काढून मनोज जरांगे पाटील…

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य; “जे कुरापती काढून संभ्रम निर्माण करत आहेत त्यांना…”

दलित मुस्लिमांसाठी उपसमिती नेमा, शेतकऱ्यांसाठी नेमा आणि मायक्रो ओबीसींसाठी उपसमिती नेमा अशीही मागणी मी करतो.” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं…

Eknath Shinde
“एका जीआरने मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत”, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “कायदेशीर अडचणी…”

Eknath Shinde on Government Resolution : एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्य सरकारने अवघ्या अर्ध्या तासात शासन निर्णय लागू केला असला तरी…

manoj jarange break hunger strike
जरांगे खरच जिंकले ? प्रीमियम स्टोरी

मोठ्या शहराला वेठीस धरल्यावर आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात, यास न्यायालयानेच वेसण घातली, हे बरे झाले. अन्यथा आंदोलनाची दिशाच…

manoj jarange maratha reservation loksatta news
दुसऱ्यांदा गुलाल उधळला… हीदेखील धूळफेक? मुंबईतील मराठा आंदोलनानंतरही उरलेल्या प्रश्नांचा वेध…

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईत दुसऱ्यांदा गुलाल उधळता आला. पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आणि दुसऱ्यांदा फडणवीस यांना…

ताज्या बातम्या