scorecardresearch

मोहम्मद सिराज News

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्यांनी महागडी क्रिकेट किट सिराजला आणून दिली. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत मोहम्मद सिराजने प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. पुढे मित्राच्या मदतीने त्याने चार मिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या सामन्यामध्ये त्याने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. या क्रिकेट क्लबमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हैदराबादच्या संघात निवड करण्यात आली.


२०१५-१६ मध्ये मोहम्मद सिराजने रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. पुढे लगेचच त्याला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा खेळता आली. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १८.९२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले. तेव्हा हैदराबादसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर्षी तो हैदराबादकडून काही सामने खेळला. पुढे २०१८ च्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केले. तो आरसीबीच्या प्रमुख गोलदांजांपैकी एक आहे.


२०१७ मध्ये सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने केन विल्यमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेत आपली क्षमता दाखवून दिली. २०१९ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. सध्या भारतीय वेगवान गोलदाजांपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोनं करत गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये आपले स्थान मिळवले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याची समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकामध्येही तो दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



Read More
zak crawley
Ind vs Eng: सिराजची ‘ती’ चूक टीम इंडियाला नडली! हॅरी ब्रुकचं दमदार शतक

Harry Brook Century: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत फलंदाजी करताना हॅरी ब्रुकने दमदार शतकी खेळी केली. मोहम्मद सिराजने १९…

Mohammed Siraj Steps on Boundary After Taking Catch of Harry Brook Left Everyone Shock Video
IND vs ENG: सिराज हे काय करून बसला? सुंदरने डोक्याला लावले हात, भारताच्या खेळाडूंनाही बसला धक्का; VIDEO व्हायरल

Mohammed Siraj Video: मोहम्मद सिराजने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. पण त्याने क्षेत्ररक्षण करताना अशी एक चूक केली…

IND vs ENG 5th Test Day 4 Live Updates India Gives 374 Runs Target to Win for England
IND vs ENG: ओव्हल कसोटी सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागणार, चौथ्या दिवसाचा खेळ लवकर का संपला?

IND vs ENG 5th Test Day 4 Live: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे.…

Mohammed Siraj Clean Bowled Zak Crawley on Last Ball as He Fell Into India Trap IND vs ENG oval test Day 3 Watch Video
IND vs ENG: सिराजच्या सापळ्यात क्राऊले अडकला! शेवटच्या चेंडूवर कसा बाद झाला इंग्लंडचा सलामीवीर?

Mohammed Siraj Bowled Zak Crawley: तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस मोहम्मद सिराजने अफलातून चेंडू टाकत झॅक क्रॉलीला त्रिफळाचीत केलं आणि भारताला पहिली…

mohammed siraj
Ind vs Eng: सिराजने मोडला मास्टर-ब्लास्टरचा विक्रम! ओव्हलच्या मैदानावर घडवला इतिहास

India vs England, Mohammed Siraj Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत मोहम्मद सिराजने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढला आहे.

Mohammed Siraj Breaks Jasprit Bumrah Record Becomes First Indian With Most 4 Wicket Haus in England
IND vs ENG: मोहम्मद सिराजने मोडला जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच गोलंदाज

Mohammed Siraj Record: मोहम्मद सिराजने ओव्हल कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करत ४ विकेट्स घेतले. यासह त्याने जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम मागे…

harry brook
Ind vs Eng: मालिकेतील सर्वोत्तम शॉट? हॅरी ब्रुकने मारलेला हा षटकार पाहिला का? Video

Harry Brook Six : इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने दमदार षटकार मारला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mohammed Siraj Dismiss Joe Root as Ball Hits on Pad LBW Jacob Bethell Wicket Video
IND vs ENG: सिराजचा भेदक मारा! चेंडू रूटच्या पायावर आदळला अन् खाली पडता पडता वाचला; VIDEO एकदा पाहाच

Mohammed Siraj Joe Root Wicket: मोहम्मद सिराजने कमालीच्या गोलंदाजीने जो रूटला चकित करत मोठी विकेट मिळवून दिली.

mohammed siraj
IND vs ENG: सिराज २०० नॉट आऊट! ओव्हल कसोटीत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

Mohammed Siraj Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला…

mohammed siraj
IND vs ENG: सिराजचा रॉकेट चेंडू पोपच्या पॅडला जाऊन लागला; गिलने शेवटच्या क्षणी DRS घेतला अन् मग..-VIDEO

Ollie Pope Video: या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने ओली पोपला भन्नाट वेगवान चेंडू टाकून बाद केलं. त्याने…

Mohammed Siraj Clean Bowled Chris Woakes on Good Length Ball Hits Bat and Later Stumps Video
IND vs ENG: Siuuu! सिराजच्या भेदक चेंडूने उडवला वोक्सचा त्रिफळा, बॅटवर आदळला बॉल अन्…; VIDEO मध्ये पाहा कसा झाला बाद?

Mohammed Siraj Bowled Chris Woakes: मोहम्मद सिराजने कमालीच्या चेंडूवर ख्रिस वोक्सला क्लीन बोल्ड केलं आहे. यासह भारताला अजून एक विकेट…

ताज्या बातम्या