scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

नाशिक न्यूज News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
OBC leader Bhujbal cites Supreme Court ruling questions Kunbi certificate Hyderabad Gazette Maharashtra government
देशात जरांगेशाही कधीही… छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगे लक्ष्य

मराठा आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयावर मंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. प्रतिज्ञापत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे देशात कुठेही मान्य…

Devendra fadnavis nashik industry loksatta
नाशिक भविष्यात उद्योगांचे केंद्र… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले ?

शिलापूर येथील केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या (सीपीआरआय) प्रादेशिक इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

smart tod electricity meter
स्मार्ट टीओडी वीज मीटर नको, जुनेच मीटर बसवा… – नागरी समस्यांप्रश्नी प्रागतिक पक्षांचा मोर्चा

माकपचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, ॲड. प्रभाकर वायचळे, विजय बागूल, प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान…

devendra fadnavis confident on ev growth with testing lab
इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेमुळे भविष्यात ईव्ही उद्योगाच्या विकासाला चालना; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास…

नाशिक येथील नवीन इलेक्ट्रिक प्रयोगशाळा ईव्ही उद्योगाच्या विकासाला गती देणार, देवेंद्र फडणवीस यांचे मत.