scorecardresearch

नाशिक न्यूज Videos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
A fire broke out at the platform of Gorakhpur-bound Godan Express from Lokmanya Tilak Terminus
लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग! | Nashik

लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग! | Nashik

Dhanushyaban will stay in Nashik Srikanth Shindes big announcement
Shrikant Shinde on Loksabha: “आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार”, श्रीकांत शिंदेची मोठी घोषणा

आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं म्हणत नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हेच असतील, अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी…

Uddhav Thackerays MahaAarti Goda Pujan at Kalaram Temple in Nashik
Uddhav Thackeray Live: उद्धव ठाकरेंचं नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती, गोदा पूजन Live | Nashik

शिवसेना ठाकरे गटाने श्रीरामाच्या भूमीचा संदर्भ देत नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. आज (२२ जानेवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे…

पूर्णाकृती शिल्पाद्वारे अमेरिकेत पोहोचलेल्या एकमेव भारतीय महिला शिल्पकार - अरुणाताई गर्गे
पूर्णाकृती शिल्पाद्वारे अमेरिकेत पोहोचलेल्या एकमेव भारतीय महिला शिल्पकार – अरुणाताई गर्गे

ख्यातनाम शिल्पकार अरुणा गर्गे यांचा कलाविश्वातील अनोखा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चित्रकलेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे शिल्पकलेकडे वळला.…

Sharad Pawar | Supriya Sule
शरद पवार, सुप्रिया सुळे शिर्डीत, मंदिरात जाऊन साईबाबांचं घेतलं दर्शन | Sharad Pawar | Supriya Sule

पक्षाच्या मेळाव्यानिमित्त शरद पवार, सुप्रिया सुळे शिर्डीत, मंदिरात जाऊन साईबाबांचं घेतलं दर्शन | Sharad Pawar | Supriya Sule

Garge art studio nashik
नाशिकमधील ‘या’ आर्ट स्टुडिओचा साजरा होतोय शतकोत्सव!

महाराष्ट्राला शिल्पकारांची अभिमानास्पद परंपरा लाभली आहे. विनायकराव करमरकर, शिल्पकार तालीम, वाघ, म्हात्रे, सोनवडेकर, राम सुतार असे दिग्गज कलावंत महाराष्ट्राला लाभले.…