scorecardresearch

नवरात्री २०२५ News

नवरात्र, नवरात्री किंवा नवरात्रोत्सव हा (Navratri 2025) भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे दर वर्षी ‘शारदीय नवरात्री’, ‘चैत्र नवरात्री’, ‘माघ गुप्त नवरात्री’ आणि ‘आषाढ गुप्त नवरात्री’ असे चार उत्सव पाहायला मिळतात. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूमधील आश्विन या महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. शरद ऋतूमुळे याला “शारदीय नवरात्रोत्सव” (Shardiya Navratri )असे म्हटले जाते. तर चैत्र या हिंदू कॅलेंडरमधील पहिल्या महिन्यामध्ये जो नवरात्रोत्सव असतो त्याला “चैत्र नवरात्रोत्सव” असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हा उत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो.


नवरात्रोत्सव (Navratriutsav) या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्रींचा उत्सव’ असा होतो. पौराणिक कथांनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस मानवांसह देवांनाही त्रास देत होता. त्याने ब्रह्मदेवाची साधना करुन एक वरदान प्राप्त केले होते. या वरदानाच्या बळावर महिषासुरने सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेव्हा महिषासुरला रोखण्यासाठी देवांनी एकत्र येत आदिशक्तीचे आवाहन केले. आदिशक्तीने दुर्गा हे रुप घेतले. पुढे दुर्गादेवीने महिषासुरच्या विरोधात युद्ध पुकारले. नवरात्रोत्सवच्या नऊ दिवसांमध्ये हे युद्ध सुरु होते असे म्हटले जाते. युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला दुर्गा देवीने महिषासुरचा वध केला. अंधकारावरचा हा तेजस्वी विजय साजरा करण्यासाठी आपल्याकडे दसरा साजरा केला जातो. या सणाद्वारे विश्वातील स्त्री तत्वाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते.


नवरात्रोत्सव हा भारतात प्रांतवार पद्धतीने बदलत जातो. महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन प्रतिपदेच्या दिवशी घट बसवले जातात. यामुळेच या दिवसाला घटस्थापना असे नाव पडले. पश्चिम बंगाल तसेच त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये दुर्गा देवीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्रोत्सवाची मोठी धुम असते. मुंबई-महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो, अगदी त्याच प्रमाणात प.बंगाल त्यातही कोलकातामध्ये नवरात्रीचा जल्लोष असतो. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गुजरातमध्ये दांडिया-गरबा (Garba- Dandiya) खेळत आनंद लुटत असतात.


Read More
thane on monday navratri utsav 3 862 idols and 7 532 ghats to be installed
Navratr utsav 2025: ठाणे जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; जिल्ह्यात ३ हजार ८६२ मूर्ती तर ७ हजार ५३२ घटांची प्रतिस्थापना

सोमवारी म्हणजेच २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे.यंदा जिल्ह्यात देवीच्या ३ हजार ८६२ मूर्ती आणि…

thane navratr utsav 192 groups applied for mandap only 24 received municipal Corporation approval
Navratr utsav 2025: ठाण्यात १६८ मंडळे नवरात्रौत्सव मंडप परवानगीच्या प्रतिक्षेत, एकूण १९२ अर्ज पण, परवानगी २४ मंडळांनाच

ठाणे शहरातील १९२ सार्वजनिक उत्सव मंडळांनी नवरात्रौत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत.२४ मंडळांना पालिकेने परवानगी दिली…

sakal hindu samaj oppose commercial dandiya garba
कराड : व्यावसायिक दांडिया-गरब्याला सकल हिंदू समाजाचा विरोध

सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अनेक समाजबांधवांची नावे आहेत.

Navratri festival preparation in Vasai Virar area
वसई विरारमध्ये नवरात्रोत्सवाची लगबग; मंडप उभारणी, सजावटीच्या कामांवर भर

यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. वसई विरार शहरात घरोघरी घटस्थापना करून…

thane city Gokhale road Navratri Utsav 2025 market
यंदाही गोखले रोड नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत लखलखणार, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

ठाणे शहरातील गोखले रोड परिसर खरेदीसाठी महत्वाचा मानला जातो. या परिसरात विविध नामांकित व्यापाऱ्यांची दुकाने आहेत.

Tuljapur Sharadiya Navratri festival Tuljabhavani temple begin with Ghatasthapana September 22
तुळजापूर नवरात्रोत्सव २०२५ : तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

नवरात्रापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी प्रारंभ झाला आहे. सात दिवसांच्या निद्रेनंतर घटस्थापनेने नवरात्रास सुरुवात होणार आहे.

CCTV with the help of ai to monitor mahalakshmi temple Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रोत्सवात ‘सीसीटीव्ही’, ‘एआय’चा वापर; आधुनिक तंत्रज्ञानाचा बंदोबस्तासाठी वापर

कोल्हापूरात या वर्षीच्या नवरात्रोत्सवात भाविक गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरातील सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी करण्याचे नियोजन करण्यात येत…

What are the 9 days colours of Navratri
Sharadiya Navratri 2025 : कोणत्या दिवशी कोणता रंग? जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग…

Navratri 9 days Colors : तर यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याबद्दल जाणून घ्यायला तुम्हीही उत्सुक असाल…

Kojagiri Purnima 2024 Wishes In Marathi
Kojagiri Purnima 2024 Wishes : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास मराठीत शुभेच्छा! WhatsApp स्टेटसवर ठेवून प्रियजनांसह साजरा करा आनंद

Kojagiri Purnima 2024 Wishes : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष भेट होत नसली म्हणून काय झालं तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून…

navratri 2024
पुण्याच्या मंडईत दिसली दुर्गामाता? देवीच्या रुपातील तरुणीला पाहून पुणेकर काय म्हणाले, पाहा Viral Video

एक तरुणी पुण्यातील मंडई परिसरामध्ये दुर्गामातेच्या रुपात दिसली. देवीच्या रुपातील तरुणीला पाहून पुणेकरांची काय होती प्रतिक्रिया?