scorecardresearch

नवरात्री २०२३ Videos

नवरात्र, नवरात्री किंवा नवरात्रोत्सव हा (Navratri 2023) भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे दर वर्षी ‘शारदीय नवरात्री’, ‘चैत्र नवरात्री’, ‘माघ गुप्त नवरात्री’ आणि ‘आषाढ गुप्त नवरात्री’ असे चार उत्सव पाहायला मिळतात. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूमधील आश्विन या महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. शरद ऋतूमुळे याला “शारदीय नवरात्रोत्सव” (Shardiya Navratri )असे म्हटले जाते. तर चैत्र या हिंदू कॅलेंडरमधील पहिल्या महिन्यामध्ये जो नवरात्रोत्सव असतो त्याला “चैत्र नवरात्रोत्सव” असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हा उत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो.


नवरात्रोत्सव (Navratriutsav) या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्रींचा उत्सव’ असा होतो. पौराणिक कथांनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस मानवांसह देवांनाही त्रास देत होता. त्याने ब्रह्मदेवाची साधना करुन एक वरदान प्राप्त केले होते. या वरदानाच्या बळावर महिषासुरने सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेव्हा महिषासुरला रोखण्यासाठी देवांनी एकत्र येत आदिशक्तीचे आवाहन केले. आदिशक्तीने दुर्गा हे रुप घेतले. पुढे दुर्गादेवीने महिषासुरच्या विरोधात युद्ध पुकारले. नवरात्रोत्सवच्या नऊ दिवसांमध्ये हे युद्ध सुरु होते असे म्हटले जाते. युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला दुर्गा देवीने महिषासुरचा वध केला. अंधकारावरचा हा तेजस्वी विजय साजरा करण्यासाठी आपल्याकडे दसरा साजरा केला जातो. या सणाद्वारे विश्वातील स्त्री तत्वाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते.


नवरात्रोत्सव हा भारतात प्रांतवार पद्धतीने बदलत जातो. महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन प्रतिपदेच्या दिवशी घट बसवले जातात. यामुळेच या दिवसाला घटस्थापना असे नाव पडले. पश्चिम बंगाल तसेच त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये दुर्गा देवीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्रोत्सवाची मोठी धुम असते. मुंबई-महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो, अगदी त्याच प्रमाणात प.बंगाल त्यातही कोलकातामध्ये नवरात्रीचा जल्लोष असतो. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गुजरातमध्ये दांडिया-गरबा (Garba- Dandiya) खेळत आनंद लुटत असतात.


Read More
Nashik
Nashik Artist: येवल्याच्या कलाकाराची कमाल; मातीच्या दिव्यात रेखाटले नवदुर्गांचे अवतार

नवरात्रोत्सवानिमित्त येवल्यातील संतोष राऊळ या कलाकाराने मातीच्या दिव्यांमध्ये नवदुर्गांचे नऊ अवतार रेखाटले आहेत. नवदुर्गांचे हे अवतार रेखाटण्याकरता संतोष राऊळ यांना १४…

Anjali Punekar
Navratri Special: विद्यार्थ्यांना हजेरी, स्वाक्षरी ते आर्थिक नियोजन शिकवणाऱ्या शिक्षिका अंजली

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रातील विशेष महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. त्याचदरम्यान पुण्यातील वडगावशेरी भागातील महापालिकेच्या…