scorecardresearch

नवरात्री २०२३ Photos

नवरात्र, नवरात्री किंवा नवरात्रोत्सव हा (Navratri 2023) भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे दर वर्षी ‘शारदीय नवरात्री’, ‘चैत्र नवरात्री’, ‘माघ गुप्त नवरात्री’ आणि ‘आषाढ गुप्त नवरात्री’ असे चार उत्सव पाहायला मिळतात. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूमधील आश्विन या महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. शरद ऋतूमुळे याला “शारदीय नवरात्रोत्सव” (Shardiya Navratri )असे म्हटले जाते. तर चैत्र या हिंदू कॅलेंडरमधील पहिल्या महिन्यामध्ये जो नवरात्रोत्सव असतो त्याला “चैत्र नवरात्रोत्सव” असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हा उत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो.


नवरात्रोत्सव (Navratriutsav) या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्रींचा उत्सव’ असा होतो. पौराणिक कथांनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस मानवांसह देवांनाही त्रास देत होता. त्याने ब्रह्मदेवाची साधना करुन एक वरदान प्राप्त केले होते. या वरदानाच्या बळावर महिषासुरने सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेव्हा महिषासुरला रोखण्यासाठी देवांनी एकत्र येत आदिशक्तीचे आवाहन केले. आदिशक्तीने दुर्गा हे रुप घेतले. पुढे दुर्गादेवीने महिषासुरच्या विरोधात युद्ध पुकारले. नवरात्रोत्सवच्या नऊ दिवसांमध्ये हे युद्ध सुरु होते असे म्हटले जाते. युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला दुर्गा देवीने महिषासुरचा वध केला. अंधकारावरचा हा तेजस्वी विजय साजरा करण्यासाठी आपल्याकडे दसरा साजरा केला जातो. या सणाद्वारे विश्वातील स्त्री तत्वाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते.


नवरात्रोत्सव हा भारतात प्रांतवार पद्धतीने बदलत जातो. महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन प्रतिपदेच्या दिवशी घट बसवले जातात. यामुळेच या दिवसाला घटस्थापना असे नाव पडले. पश्चिम बंगाल तसेच त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये दुर्गा देवीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्रोत्सवाची मोठी धुम असते. मुंबई-महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो, अगदी त्याच प्रमाणात प.बंगाल त्यातही कोलकातामध्ये नवरात्रीचा जल्लोष असतो. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गुजरातमध्ये दांडिया-गरबा (Garba- Dandiya) खेळत आनंद लुटत असतात.


Read More
Navaratri-2023-Fasting-Causes-Acidity
12 Photos
Navratri 2023: नवरात्रीच्या उपवासामुळे अ‍ॅसिडिटी होतेय? ‘या’ पदार्थांमुळे लगेच मिळेल आराम

नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. मात्र यामुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते.

navratri cover
9 Photos
Navratri 2023: देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; भाविकांनी घेतला गरबा-दांडिया खेळण्याचा आनंद

पंचांगानुसार या वर्षी नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरला झाली आणि २४ ऑक्टोबरला संमाप्त होईल.

Navratri 2023 Fasting tips
8 Photos
Navratri 2023: नवरात्रीत उपवास करताना खाऊ शकता ‘हे’ पौष्टिक पदार्थ

Navratri 2023 : उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश केल्यास लवकर भूक लागत नाही आणि शरीरातील ऊर्जाही टिकून राहण्यास…

Navratri-2023-nine-colours-and-their-significance
13 Photos
Navratri 2023: नवरात्रीच्या नऊ रंगांचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या पौराणिक मान्यता आणि महत्त्व

नवरात्र म्हणजे नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांची मनोभावे केलेली आराधना, गरब्याची धमाल, आणि नऊ रंग. या रंगांना अनुसरून महिला नऊ…