scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार Videos

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.


Read More
Pawar family come together Sunetra Pawar gave a clarification on journalist questioned
Sunetra Pawar: पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar: बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल…

Will Sharad Pawar and Ajit Pawar both come together ajit pawar gave a reaction on journalist questioned
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar: जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार…

Will sharad pawar and ajit pawar come together supriya Sule gave a reaction
Supriya Sule: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule: शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे युतीची चर्चा जोर धरत असताना आता राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचीही चर्चा…

Who is Karishma Hagawane Full Biography Main Accused In The Suicide Case of Vaishanavi hagwane Pune
अजित दादांच्या पत्नी, बहिणीपासून ते आदिती तटकरेंपर्यंत; करिष्मा हगवणेचं राष्ट्रवादी कनेक्शन समोर!

Who Is Karishma Hagwane: १६ मे रोजी वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली तिच्या पालकांनी तिच्या सासरच्यांविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर, पोलिसांनी…

Jitendra Awhads reaction on Operation Sindoor
Jitendra Awhad: “प्रत्येक भारतीयाला अभिमान…”; ऑपरेशन सिंदूरवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

Jitendra Awhad: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. “यह तो झांकी है,अभी बहुत…

If Sharad Pawar and Ajit Pawar come together Hasan Mushrif gave a reaction
Hasan Mushrif: “शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर…”; हसन मुश्रीफ स्पष्टच बोलले

Hasan Mushrif: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसेच काल शरद पवार…

Pawar family together at Jai Pawars engagement Supriya Sule gave a reaction
Supriya Sule on Jay Pawar: जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा गुरवारी बारामती येथे संपन्न झाला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित…

ncp sharad pawar faction rohini khadse has written a letter to the president raised women safety issue
Rohini Khadse Letter to President: रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र, पोस्ट करत म्हणाल्या…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मोठी मागणी…

Rohit Pawar criticized devendra fadanvis over raksha khadse muktainagar issue
Rohit Pawar on Mahayuti:”फडणवीसांनी महाराष्ट्राला खोटं सांगितलं”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा…

Rohini Khadses criticism over the Raksha Khadse daughter issue at muktainagar
Rohini Khadse: गृहखातं अपयशी ठरलं!, रोहिणी खडसेंची टीका

रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.…

ताज्या बातम्या