scorecardresearch

पोलीस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
Case registered against 150 protesters in Dadar pigeon house protest case
कबुतरखाना आंदोलन प्रकरणी १५० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल; ५० हून अधिक महिलांचा समावेश

दंगल, बेकायदा जमावबंदी व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेकडून कोणतीही तक्रार करण्यात न आल्यामुळे अखेर…

Man’s Body Found Rotting In A Drum
Rajasthan : निळ्या ड्रममध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीसह प्रियकराला अटक

राजस्थानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यातील एका घराच्या छतावर ड्रममध्ये भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे

Child marriage prevented due to vigilance of Jejuri police Case registered against five people pune print news
जेजुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावात रविवारी दुपारी दीड वाजता बालविवाह सुरू असल्याची माहिती समजताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखला.

ताज्या बातम्या