scorecardresearch

पोलीस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
man arrested for beating woman in kanpur
इन्स्टावर प्रेयसीनं सांगितलं २० वर्षं वय, प्रत्यक्ष भेटीत सत्य आलं समोर; महिलेला मारहाण प्रकरणी प्रियकराला अटक!

वयस्कर महिलेनं तरुण असल्याचं भासवून तरुणाशी केली मैत्री, दोघं प्रेमात पडले..पण प्रत्यक्षात भेटले तेव्हा…

nagpur traffic police marathi news, nagpur traffic police collect fine of 5 crores marathi news
नागपूर: तीन महिन्यांत दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई, पावणेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल

नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. शासनाकडून दंडाची रक्कम वाढवल्यानंतर वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा होती.

Police destroyed Robbers Abandoned Houses, Robbers Using Abandoned Houses to stay, Robbers Using Abandoned hide, Houses to stay, Navi Mumbai, Kopar Khairane Area, robbers in kopar khairane,
जनसहभागातून गर्दुल्ल्यांचा अड्डा उद्ध्वस्त, कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी 

नवी मुंबईतील कोपरखैरणे गावातील एका आडोशाच्या जागेवर असलेल्या पडक्या घरात गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला होता. तेच लोक छोट्या मोठ्या चोऱ्याही…

Kalamboli Iron and Steel Market, Kalamboli Iron and Steel Market Plagued by Thefts, Police Arrest First Suspect, robbery in Kalamboli Iron and Steel Market, Kalamboli Iron and Steel Market news, marathi news, panvel news, robbery news, kalamboli news,
कळंबोली लोखंड बाजारातील गोदाम फोडून २६ लाखांचा माल मुंबईला विकणाऱ्याला अटक

सहा दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी लोखंड बाजारातील १४८७ क्रमांकाच्या गोदामामधून मध्यरात्री ते पहाटेपर्यंत गोदामाचे कडी तोडून त्यांनी गोदाम लुटले. अक्षरशा स्टील चोरीचा…

Nagpur, Man Stabs Brother to Death in Nagpur, Dispute about Parents, murder in nagpur, crime in nagpur, marathi news, crime news, nagpur crime news,
आईवडीलांना शिवीगाळ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

आईवडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. ही थरारक घटना रविवारी…

offensive song during marriage marathi news
लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात

जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) या गावात लग्नाच्या वरातीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन गट एकमेकांना भिडले.

police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला पडलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाताना भरधाव वेगातील मोटारीने जोरात ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.