scorecardresearch

प्रसिद्ध कृष्णा News

प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. तो राज्यस्तरावर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा जन्म १९ फेब्रुवारी १९९७ रोजी कर्नाटकमधल्या बंगळुरु शहरामध्ये झाला. २०१५ मध्ये बांगलादेश-ए विरुद्ध झालेल्या सामन्यामुळे प्रसिद्ध कृष्णा प्रकाशझोतात आला. कर्नाटक आणि बांग्लादेश-ए यांच्यादरम्यान सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यामध्ये कर्नाटक संघाचे ३ वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने कृष्णाला संघामध्ये सामील करण्यात आले. मिळालेल्या संधीचं सोनं करत प्रसिद्ध कृष्णाने ५ फलंदाजांना बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे कर्नाटक संघाचा विजय निश्चित झाला.


पुढे २०१६-१७ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Hazare Tropify)  खेळायची संधी मिळाली. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफी अशा स्पर्धांमध्येही प्रसिद्ध कृष्णा झळकला. थोड्याच कालावधीत इंडिया ए संघात त्याची निवड झाली. दरम्यान २०१८ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर या संघामध्ये कृष्णाला सामील करण्यात आले. कमलेश नागरकोटी या गोलंदाजाच्या जागी त्याला खेळवण्यात आले. मे २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात शिवम मावीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्यात आली. २०१८ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत तो केकेआरमध्ये होता. पुढे २०२२ च्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने १० कोटी रुपयांची बोली लावली. राजस्थानच्या संघामध्ये गेल्यानंतर कृष्णाचा खेळामध्ये प्रगती झाल्याचे पाहायला मिळाले.


मार्च २०२१ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला सामील करण्यात आले. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात ठरली. २३ मार्च २०२१ रोजी त्याने पदार्पण केले. या सामन्यामध्ये त्याने ४ गडी बाद केले. भारताने हा एकदिवसीय सामना ६६ धावांनी जिंकला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये कृष्णाने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. २०२३ च्या आयपीएलच्या हंगामामध्ये त्याने चांगला खेळ केला होता. एकूण कामगिरी पाहून बीसीसीआयने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) च्या संघामध्ये त्याचा समावेश केला आहे.



Read More
mohammed siraj prasidh krishna
IND vs ENG: मोहम्मद सिराज झाला प्रसिद्ध! पण कृष्णाचंही ऐतिहासिक विजयात मोलाचं योगदान

Mohammed Siraj- Prasiddh Krishna: भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दरम्यान या विजयात सिराज आणि प्रसिध कृष्णाने मोलाचं…

India vs England 5th Test Day 5 Live cricket score, players in action
IND vs ENG: भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी चित्तथरारक विजय; मालिका २-२ बरोबरीत

India vs England 5th Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने दमदार…

joe root
Ind vs Eng: जो रूट- प्रसिध कृष्णा लाईव्ह सामन्यात का भिडले? नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Joe Root vs Prasidh Krishna: जो रूट आणि प्रसिध कृष्णा यांच्यातील वाद नेमका कशामुळे झाला? याबाबत प्रसिध कृष्णाने मोठा खुलासा…

Joe Root Abuse Prasidh Krishna in Heated Exchange During IND vs ENG 5th test VIDEO
IND vs ENG: रूट-प्रसिधमध्ये मैदानातच राडा, इंग्लंडच्या फलंदाजाने घातल्या शिव्या; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Joe Root Prasidh Krishna Fight: ओव्हल कसोटीत जो रूट आणि प्रसिध्द कृष्णा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. रूट प्रसिध्दला शिव्याही घालताना…

prasidh krishna
Ind vs Eng: धू धू धुतलं! प्रसिद्ध कृष्णाने नोंदवला कसोटीतील नकोसा रेकॉर्ड

Prasidh Krishna Record: भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या नावे नकोसा रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने एकाच षटकात २३ धावा खर्च…

harry brook
IND vs ENG: हॅरी ब्रुकने मस्त डोकं लावलं! विकेट वाचवण्यासाठी अशी लढवली शक्कल; पाहा video

Harry Brook Saves His Wickets: दुसऱ्या कसोटीत हॅरी ब्रुक बाद होणारच होता, इतक्यात त्याने डोकं लावलं आणि आपली विकेट वाचवली.

prasidh krishna
IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णाच्या भन्नाट बॉलवर ओली पोपची बत्ती गुल! VIDEO एकदा पाहाच

Prasidh Krishna Took Wicket Of Ollie Pope: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ओली पोपला त्रिफळाचित केलं. ज्याचा व्हिडीओ सध्या…

prasidh krishna
“तू षटकार मारू शकतोस का?”, प्रसिद्ध कृष्णा जॅक क्रॉलीचं तोंड बंद करायला गेला अन् भलतंच घडलं – VIDEO

Prasidh Krishna Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात जॅक क्रॉलीने प्रसिद्ध कृष्णाला षटकार मारू शकतोस का…

Cleaning and excavation on Krishna Ghat begins, Karad Municipality administration ordered to take action
कराडच्या कृष्णा घाटावरील पुरातन बुरुज पुन्हा उजेडात; बुरुजांभोवतीची माती व वाळू हटवण्याचे काम सुरू

काळाच्या ओघात हे बुरुज गाळ, माती व वाळूने पूर्णपणे झाकले गेल्याने ते लोकांच्या नजरेआड झाले होते. मात्र, एका जागरूक नागरिकाच्या…

Life Changing Lessons to Learn from Lord Krishna
Shree Krishna’s Lessons: : श्रीकृष्णापासून शिका सुंदर आयुष्य कसे जगावे? प्रत्येक व्यक्तीने वाचायला पाहिजे ‘या’ गोष्टी

आज आपण जाणून घेणार आहोत की कसे श्रीकृष्णाच्या जीवनापासून बोध घेत आपण स्वत:चे कल्याण करू शकतो.

Prasidh Krishna made a unique record against Australia became the Indian bowler who spent the most runs in T20
IND vs AUS: टी-२०मध्ये प्रसिध कृष्णाच्या नावावर झाला नकोसा विक्रम, पुढच्या सामन्यात संधी मिळणार का? जाणून घ्या

IND vs AUS 3rd T20: भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने तिसऱ्या टी-२० सामन्यात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली. तो सर्वात महागडा…