scorecardresearch

राहुल गांधी Photos

RAHUL GANDI

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीला काही प्रमाणात यशही मिळाले. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यापैकी वायनाड मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला असून याठिकाणी आता त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा पोटनिवडणुकीला उभ्या राहणार आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० साली झाला. २००४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ ते २०१४ अशी यूपीएची सत्ता असतानाही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी किंवा घटनात्मक पद भूषविले नव्हते. थेट २०२४ साली वीस वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याच्या रुपात त्यांना घटनात्मक पद मिळाले आहे.


Read More
B Sudershan Reddy Education Qualification, B Sudershan Reddy LLB
9 Photos
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचं शिक्षण किती? त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घ्या….

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, ते किती शिक्षित आहेत आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे…

Gaurav Gogoi
9 Photos
पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसचे सरकारला सात प्रश्न, लोकसभेत संरक्षण मंत्र्यांना घेरलं

Congress MP Gaurav Gogoi : “गृहमंत्री पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न गौरव गोगोई यांनी उपस्थित केला.

who was himani narwal Haryana congress leader murder case
10 Photos
कोण होती काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल? सूटकेसमध्ये मिळाला मृतदेह; मुलीच्या हत्येनंतर आई काय म्हणाली?

Himani Narwal : आपण कायद्याचे शिक्षण घेत असून गेल्या दशकापासून पक्षाशी संबंधित असल्याचे तिने सांगितले होते. गांधींबरोबरचे तिचे फोटोही व्हायरल…

Sonia Gandhi inaugurates Congress’ new headquarters in Delhi. (Image Source: Congress)
12 Photos
Photos : सोनिया गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन, दिल्लीतील या कार्यालयाचं नाव काय?

या इमारतीची पायाभरणी डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती.

Rahul gandhi somnath suryawanshi parabhani visit photos congress mva
9 Photos
Photos : सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राहुल गांधी परभणीत, म्हणाले “ते दलित होते आणि…”

“सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असाही खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.

india alliance leaders protested against home minister amit shah statement about b r ambedkar
12 Photos
निळा टी-शर्ट, निळी साडी, हाती संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो; संसदेबाहेरील आंदोलनातील राहुल- प्रियांका गांधींच्या लूकने वेधले लक्ष

India Alliance Protest Again Amit Shah Photos : कालचा संपुर्ण दिवस या आंदोलनांनी गाजवला.

Priyanka Gandhi Lok Sabha MP Oath Taking Ceremony
13 Photos
प्रियांका गांधी यांनी लोकसभेत शपथविधीसाठी नेसली केरळची पारंपरिक साडी; फोटोंनी वेधले लक्ष

Priyanka Gandhi Lok Sabha MP Oath Taking Ceremony: १३ नोव्हेंबर रोजी याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका यांनी विजय मिळविला.

Priyanka Gandhi files nomination
10 Photos
जांभळ्या रंगाच्या साडीत प्रियांका गांधींचा साधा लूक, भरला उमेदवारी अर्ज, किती आहे प्रॉपर्टी?

How much property does Priyanka Gandhi own: वायनाडमध्ये नॉमिनेशन फॉर्म दाखल करतावेळी प्रियांका गांधी यांनी परिधान केलेल्या साडीमध्ये प्रियंका गांधीं…

gandhi jayanti
11 Photos
Photos : पंतप्रधान मोदी, राहुल गांधी ते दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, राजघाटावर ‘या’ विदेशी पाहुण्यांनीही महात्मा गांधींना जयंतीदिनी केले अभिवादन!

Gandhi Jayanti 2024: २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन बापूंना आदरांजली…

Rahul Gandhi arrives in Dallas for US visit
9 Photos
Rahul Gandhi US visit : विरोधी पक्षनेते झाल्यांनतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर, भारतीय नागरिकांशी साधणार संवाद

काँग्रेस नेते राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्याच्या या दौऱ्यातून त्यांन खूप अपेक्षा आहेत.

ताज्या बातम्या