scorecardresearch

रेल्वे News

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
udhna brahmapur express loksatta
प्रवाशांसाठी आनंदवार्ता! उधना-ब्रम्हपूर अमृत भारत एक्स्प्रेस आता आठवड्यातून तीन दिवस

१९०२१ उधना-ब्रम्हपूर अमृत भारत एक्स्प्रेस आता दर रविवार, बुधवारी आणि शुक्रवारी धावणार आहे.

Central Railway
मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार…

kalyan east railway station
कल्याण पूर्वेत स्कायवॉकजवळ सरकता जिना, उद्वाहन बसवा; कडोंमपा आयुक्तांची रेल्वेच्या वरिष्ठांकडे मागणी

कल्याण पूर्व भागातून दररोज शेकडो नागरिक रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवास करतात.

Central Railway
चेन्नई, गुजरातमध्ये जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना एलएचबी डबे

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षितता आणि चांगल्या सुविधेसाठी आठ रेल्वेगाड्यांमधील जुन्या डब्यांच्या जागी नवीन लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) एलएचबी डबे कायमस्वरूपी…

train attack news in marathi
रेल्वेत आसनाच्या वादातून प्रवाशावर ‘कात्री’ने वार, प्रवास खरोखर सुरक्षित आहे का?

चोरीच्या घटना अनेकदा एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमध्ये घडतात. परंतु आता प्रवाशावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Crimes against those protesting at CSMT mumbai print news
सीएसएमटीत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे; सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

मुंब्रा दुर्घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या अभियंत्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला, असा दावा करत गुन्हे मागे घेण्यात यावेत या…

mahanagari express bomb threat
VIDEO : महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा; जळगाव, भुसावळ स्थानकांवर तपासणी !

काळ्या खडूच्या सहाय्याने शौचालयात लिहिलेला संदेश प्रवाशांनी वाचला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली.

Shegaon Gajanan Maharaj Temple High Alert Delhi Blast Aftermath Maharashtra Security Railway police
दिल्लीत स्फोट, शेगावात हाय अलर्ट; गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावर…

दिल्लीच्या घटनेनंतर तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमधील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या व येथून जाणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे, ज्यामुळे संपूर्ण शेगाव…

thane Passengers phone fell from local train near mumbra tunnel later found beside tracks
मुंब्रा रेल्वे बोगद्याजवळ लोकलमधून पडलेला कल्याणमधील प्रवाशाचा मोबाईल सापडला

मुंब्रा रेल्वे बोगद्याजवळ  लोकलमधील एका प्रवाशाचा हातामधील मोबाईल दरवाजात उभा असताना, अचानक हातामधून रेल्वे मार्गात पडला. रेल्वे मार्गाच्या बाजुला दगडांच्या…

central railway to expand 27 stations introducing 15 coach local trains
Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांचा लोकल प्रवास होणार सुखकर…

लोकल प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या २७ स्थानकांच्या…

ताज्या बातम्या