scorecardresearch

रेल्वे News

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
Konkan Journey on Vande Bharat Express, 2 hours extra journey konkan Vande Bharat Express, Vande Bharat Express 2 Hours extra journey, Mumbai Goa Route, Monsoon Schedule, konkan railway monsoon Schedule, Vande Bharat Express slow down, Konkan Journey by Vande Bharat Express, marathi news, konkan railway news,
कोकणातील वंदे भारतचा प्रवास दोन तासांनी वाढणार

कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वंदे भारताचा वेग मंदावणार असून सुमारे ८ तासांच्या…

thane Election Officials, Directs RPF Deployment at Railway Stations, Curb Cash Movement, lok sabha 2024, thane lok sabha, bhiwandi lok sabha, kalyan lok sabha, marathi news, election officer thane, rpf, Railway Protection Force, marathi news, thane news, election news,
रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत, रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश

मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च…

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट

साधारण तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त प्रवास भाडे (ईएफटी) घेऊन प्रवासास मुभा दिली जात असल्याने आरक्षणधारक प्रवाशांची गैरसोय…

Mumbai, Overcrowding ,
मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी

शाळा, महाविद्यालयांना पडलेल्या उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने परप्रांतीय मुंबईतून आपापल्या राज्यात जात आहेत.

Pune, railways, congestion,
पुणे : गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा नवा फंडा! आता प्रवाशांना सीटवरच मोफत पिण्याचं पाणी

उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

indian railway change the charges for canceling waiting ticket know the new charges list irctc rules confirm ticket cancellation charges ac sleeper waiting rac
ट्रेनचे वेटिंग तिकीट रद्द केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात बदल; प्रत्येक कोचनुसार आता किती पैसे घेतले जातील? जाणून घ्या

Train ticket refund rules: भारतीय रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याबाबतच्या निमयांमध्ये बदल केला आहे. हा बदल नेमका काय आहे समजून…

Passenger sleeps in makeshift hammock in overcrowded Brahmaputra Mail Railway Pics video
कोणी बेडशीटचा बांधला झोका, कोणी शौचालयात बसून केला प्रवास! रेल्वेत प्रवाशांची खचाखच गर्दी, Photo, Video व्हायरल

गर्दीने खचाखच भरलेल्या ब्रह्मपुत्रा मेलमध्ये एका प्रवाशाला झोका बांधून करावा लागतोय प्रवास!

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त प्रीमियम स्टोरी

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल आहे. त्या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांंनी प्रवास करावा, असे प्रवाशांंचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या