scorecardresearch

पाऊस Photos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Maharashtra Temples contribution for Flood affected Peoples Who donate how much know the details
12 Photos
देव आला धावुनी! राज्यातील पूरग्रस्तांना देवस्थानांचा मोठा आधार, आतापर्यंत कोणी किती दिली मदत?

सध्या सर्वच स्तरातून पूरग्रस्तांसाठी मदत दिली जात आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रमुख देवस्थानांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला…

8 Photos
Photos: देहरादूनमध्ये भयंकर जलप्रलय! अख्खं मंदिर पाण्याखाली, रस्ते-वाहनांचं प्रचंड नुकसान, पूराचे भयावह फोटो व्हायरल

मुसळधार पावसामुळे सहस्त्रधारामधल्या, चंद्रभागा आणि तामसा यांसारख्या नद्या वाहत होत्या, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे डेहराडूनमधील…

Mumbai Rain News Update
9 Photos
Mumbai Rain Updates: मुंबईत काही ठिकाणी मुसळधार; वरळीत रस्त्यावर साचलं पाणी, लोकल सेवाही विस्कळीत…

Heavy Rain Alert in Mumbai : सकाळपासून रिमझिम सुरू असल्याने बरीचशी वाहतूक सेवेची साधणं विस्कळीत होताना यावेळी पाहायला मिळताहेत.

Mumbai rains 2025: IMD issues ‘red alert’ - Waterlogged streets, stranded commuters and railway chaos | in images
16 Photos
Photos : गेल्या ४ दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची संततधार, रस्त्यांना नदी- नाल्याचं स्वरूप; कुठे काय स्थिती? पाहा फोटो

पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे सेवा बंद पडल्या, शाळा बंद पडल्या आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मुंबईच्या पलीकडे, नांदेडमध्ये…

Mumbai Rain
1 Photos
मुंबई पाण्यात आणि मुंबईकर घरात; पाहा शहराची काय झाली अवस्था

Mumbai Rain: मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Mumbai drenched: Heavy rainfall, flooded roads, and traffic chaos bring the city to a standstill
7 Photos
मुंबई चिंब! सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली; वाहतूक कोंडीने शहर ठप्प, रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि उपनगरीय जिल्ह्यांसाठी पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देणारा ‘रेड’ अलर्ट जारी…

Rescue operations underway in J&K's Kishtwar after cloudburst; at least 60 dead, hundreds missing
8 Photos
Photos : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर बचावकार्य सुरू; किमान ६० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

या घटनांमुळे किश्तवाडमध्ये किमान ६० जणांचा मृत्यू झाला आणि कठुआमध्ये आणखी काही जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी किंवा…

In pictures: India welcomes the Monsoon - Stunning scenes from across the country
9 Photos
Photos : पावसाच्या आगमनानंतर देशभरातले विविध मजेदार फोटो समोर; उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा…

संपूर्ण भारतात पावसाचं आगमन झाल्याने देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून विविध हृदयस्पर्शी फोटो समोर समोर येत आहेत. दिल्लीतील रस्त्यांपासून ते हिमाचल प्रदेशातील…

Best honeymoon spots monsoon
10 Photos
पावसाळ्यामध्ये जोडीदाराला ‘या’ठिकाणी पिकनिकला न्या; निसर्गसौंदर्य पाहून पत्नीचे तुमच्यावरील प्रेम आणखी वाढेल…

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यातले दृश्य खूपच सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू…