scorecardresearch

पाऊस Photos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Cyclone michaung photo gallery, Cyclone michaung, cyclone michaung updates, cyclone, andhra pradesh, tropical storms, Myanmar, latest news on Cyclone michaung, top news, business news,
10 Photos
चक्रीवादळ Michaung ने केला कहर! चेन्नईमध्ये पूरसदृश परिस्थिती, विमानांचे उड्डाणदेखील झाले रद्द, फोटो पाहा

Michaung (migjaum म्हणून उच्चारले जाते) हे म्यानमारने सुचवलेले नाव आहे, याचा अर्थ ताकद किंवा लवचिकता आहे.

Monsoon, mayhem, Uttarakhand
7 Photos
PHOTOS: रस्ते-पूल-लोहमार्ग गेले वाहून, घरंही कोसळली; हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार

उत्तराखंडमध्येही पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जोशीमठजवळ घर कोसळून दोघांचा मृत्यू झाला.

26 july 2005 flood photos
22 Photos
बेफाम पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलैची आठवण, ‘हे’ फोटो पाहिले की आजही येतो अंगावर काटा

Photos of 26 July 2005 : २६ जुलैच्या महाप्रलयाची आठवण करून देणारा पाऊस गेल्या दोन दिवसांपासून कोसळत आहे.

irshalwadi landslide rescue operation
16 Photos
…अन् काही क्षणांत समोर मातीचा ढीग झाला; ईर्शाळवाडीवर दरड कोसळली, गावाची ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्यं!

बुधवारी रात्रीच्या सुमारास रायगडाच्या ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळली असून ३० ते ४० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.ो

12 Photos
Photos : अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाड्याला झोडपले, गारपीटीमुळे शेतीवर नवं संकट

विदर्भ, मराठवाडय़ात अवकाळी पावसासह मंगळवारी गारपीट झाली़ औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक गावांत मंगळवारी सायंकाळी गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे…

8 Photos
Photos : कोलकात्यात वादळाचे भयानक पडसाद, रस्त्यावर पाणी, दैनंदिन जीव विस्कळीत, फोटो पाहा…

जावेद वादळानंतर पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (६ डिसेंबर) तुफान पाऊस आला. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. अनेक शहरांमध्ये पाणीच पाणी…