scorecardresearch

पाऊस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Maharashtra farmers kharif sowing season relief | Unseasonal rain compensation fund Maharashtra government | Amravati division farmer crop damage relief | Prabodh Deshpande Akola agriculture report
खरीप पेरणीच्या मदतीला ‘अवकाळी’चा निधी; राज्यातील ४५ हजारावर शेतकऱ्यांसाठी ८४.२३ कोटी; पश्चिम विदर्भाला सर्वाधिक…

ऐन खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर अमरावती विभागातील २८ हजार ७५१ शेतकऱ्यांना सर्वाधिक ६८.०९ कोटी रुपयांची मदत मिळणार.

Sindhudurg heavy rain power outage | Nitesh Rane Mahadiscom electricity restoration work | Sindhudurg guardian minister disaster management | Maharashtra monsoon power supply damage repair
सिंधुदुर्गात वादळी पावसामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान; पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ जुलैपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक गावांना अंधाराचा सामना करावा…

mumbai weather forecast imd | mumbai rain update today | mumbai humidity and temperature | maharashtra monsoon season news
मुंबईत पावसाची विश्रांती, उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज

मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता विश्रांती मिळाली असून शहरात उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे.

Nalasopara tea vendor viral video | Dirty water tea kettle washing Nalasopara | Vasai Virar food safety issue | Mumbai railway station food hygiene viral video
नागरी आरोग्याशी खेळ : नालासोपाऱ्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाच्या किटल्या धुतल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

पावसाच्या दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापरामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Thane heavy rain paddy cultivation | Maharashtra farmers sowing rice | Kalyan Bhiwandi crop damage report | Agriculture department relief package update
जोरदार पावसाने भात पेरणीला वेग; ठाणे जिल्ह्यात ३३५८ हेक्टरवर पेरणी पूर्ण, रोपवाटिकाही ४,४६० हेक्टरवर

ठाणे जिल्ह्यात जून महिन्यातील ओढ्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

Badlapur Ulhas River new bridge flooding | Badlapur traffic updates monsoon | PWD Maharashtra bridge design issue | Badlapur news today live updates
बदलापुरचा उल्हासनदीवरील नवा पूल वादाच्या भोवऱ्यात, पावसाचे पाणी साचत असल्याने उभारणीवरच प्रश्न

बदलापुरात उल्हास नदीला पूर येताच चौपाटीजवळ उभारण्यात आलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा एकदा पाणी साचले आहे.

Maharashtra voter list revision campaign | Mumbai voters registration update | Maharashtra election commission SIR drive | Mumbai redevelopment project voters data
पावसाने मतदारयाद्यांच्या फेरतपासणीच्या(SIR) मोहिमेला फटका

राज्यात सुरु असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेला (SIR) मुंबईत मुसळधार पावसामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

Snail attack on crops in Marathwada Latur | Dharashiv Parbhani agriculture damage snail menace | Maharashtra farmers soybean crop loss | Snail control metal aldehyde subsidy agriculture department
Video अबब ! किती त्या गोगलगायी मराठवाड्यात दुष्काळात तेरावा

‘रात्री येऊन गोगलगायींची संख्या बघ, पेट्रोलचे पैसे मी देते’; धाराशिवच्या कळंबमध्ये पाहणीसाठी गेलेल्या आमदारांना वृद्ध महिलेने सुनावले

Raghuveer Ghat closed for tourists | Ratnagiri Khed landslide danger updates | Maharashtra monsoon travel restrictions | Khed tourist spots banned in heavy rain
दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट पर्यटकांसाठी १० ऑगस्टपर्यंत बंद

उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांचे प्रतिबंधात्मक आदेश; दरीकडील रस्त्याची कडा तुटल्याने आणि डांबरी रस्ता खचल्याने अपघाताचा मोठा धोका

Girna dam water level storage increase 2026 | Jalgaon agriculture irrigation water supply crisis | Hatnur dam gates opening Tapi river Maharashtra | Nashik watershed area monsoon heavy rainfall update
‘गिरणा’ धरणाचा पाणीसाठा ४० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; जळगावातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेरसह १५० हून अधिक गावे, ४ नगरपालिका आणि ४५ हजार हेक्टर शेती क्षेत्राला मिळणार थेट आधार.

Pune heavy rainfall monsoon update july records | Weather forecast IMD shivajinagar observatory pune | Bengal bay low pressure area active monsoon maharashtra | Chinmay Patankar reporter Pune weather news updates 2026
Maharashtra Monsoon Update : एल निनोच्या सावटातही आठ दिवसांतील पावसामुळे दोन विक्रमांची नोंद!

शिवाजीनगर वेधशाळेत ६ जुलै रोजी २४ तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस; अवघ्या ६ दिवसांतच ओलांडली संपूर्ण महिन्याची सरासरी.

ताज्या बातम्या