scorecardresearch

राज ठाकरे Videos

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
MP Shrikant Shindes criticism of Thackeray brothers
Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका; म्हणाले…

Shrikant Shinde: महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरील नमो केंद्रावरून राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी पहिल्यांदाच त्यांच्यावर टीका केली…

MNS chief Raj Thackeray criticizes State Election Commission
Raj Thackeray on State Election Commission:सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं, राज ठाकरेंचा आयोगावर संताप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील २४६ नगरपालिका…

Raj Thackeray criticized the government as well as the Election Commission
Raj Thackeray: “हे सगळे दुबार मतदार आहेत..”; राज ठाकरेंनी याद्यांचा गठ्ठाच दाखवला

Raj Thackeray: मविआ आणि मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ आज (१ नोव्हेंबर) मुंबईत पार पडत आहे. या मोर्चात राज ठाकरेंनी भाषण केलं.…

sanjay raut gave a explanation on uddhav thackeray and raj thackeray meet
Sanjay Raut: मातोश्रीवर ठाकरे बंधूंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? राऊत म्हणाले…

Sanjay Raut: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काल (५ ऑक्टोबर) मातोश्री या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी…

Thackerays loyal worker Mohan Yadav has arrived in Mumbai in Balasaheb Thackerays special vehicle
खाण्या-राहण्याची सोय केली, आज राज – उद्धव साहेबांची युती आज होणारच- एकनिष्ठ शिवसैनिक। Mohan Yadav

Uddhav Thackeray Dasara Melava: आज शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते मोहन…

Amit Thackerays post is in the news after Manoj Jaranges criticism of Raj Thackeray
Amit Thackeray Post: जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा आंदोलनाबबात केलेल्या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता मनसे नेते अमित…

Deputy Chief Minister Eknath Shindes counterattack on Raj Thackerays statement
Eknath Shinde on Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर, एकनाथ शिंदेंचा पलटवार

हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज…

After visiting Bappa at Raj Thackerays house Deputy Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray
राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…

Eknath Shinde: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या घरी सदिच्छा भेट देत असतात. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती…

Uddhav Thackeray visits Shivatiirth residence for the first time
Uddhav Thackeray – Raj Thackeray उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी,गणरायाचं घेतलं दर्शन

Uddhav Thackeray and Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील…

ताज्या बातम्या