scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सदाभाऊ खोत Photos

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच मरळनाथपूर (ता.वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील ते कार्यकर्ते आहेत. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत लढतात. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १० जून २०१६ रोजी सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे नेते म्हणून सदाभाऊ खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.


Read More