scorecardresearch

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यासह शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभवही शार्दुलकडे आहे. अंगी असलेल्या कौशल्यामुळे त्याला लॉर्ड हे टोपननाव पडले आहे. शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये झाला. शालेय जीवनामध्येच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो पालघरवरुन दक्षिण मुंबईला लोकलने प्रवास करत यायचा. मेहनत आणि चिकाटी या गुणांमुळे त्याचा खेळ दिवसेनदिवस चांगला होत गेला.


कमी उंची आणि जास्तीचे वजन या गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात शार्दुलवर टीका केली जात असे. असे असतानाही त्याने मुंबईच्या संघात स्थान पटकावले. २०१२-१३ च्या रणजी स्पर्धेमध्ये त्याने मुंबईकडून खेळत पदार्पण केले. २०१३-१४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये २६.२५ च्या सरासरीने २७ गडी बाद केले. पुढच्या हंगामामध्ये त्याने दहा रणजी सामन्यांमध्ये २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले. तेव्हा शार्दुलने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला. पुढे त्याला रणजी, विजय हजारे ट्रॉफीसह अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये शार्दुलने सौराष्ट्र संघाच्या आठ फलंदाजांना बाद करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले.


२०१५ च्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये त्याच्यावर किंग्स इलेवन पंजाब या संघाने बोली लावली. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांमध्ये तो पंजाबकडून खेळला. पुढे २०१७ मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुल ठाकूर सामील झाला. या काळात त्याचा खेळ आणखी चांगला होत गेला. तो ऑल-राऊंडर म्हणून देखील नावारुपाला आला. पुणे नंतर त्याला चेन्नईच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. ३ वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर लिलावामध्ये त्याच्यावर दिल्ली संघाकडून बोली लावण्यात आली. २०२३ पासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.


शार्दुलने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने टी-२० मध्येही पदार्पण केले. त्याच वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा त्याचा पहिला कसोटी सामना होता. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये २५४ धावा केल्या आहेत, तर २९ गडी बाद केले आहेत; ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९८ धावा केल्या आहेत, तर ५० गडी बाद केले आहेत; २५ टी-२० सामन्यांमध्ये ६९ धावा केल्या आहेत, तर ३३ फलंदाजांना बाद केले आहे. आगामी आशिया कप २०२३ च्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्वचषक स्पर्धेमध्ये संधी मिळू शकतो असे म्हटले जात आहे.



Read More
lucknow super giants
IPL 2026 Retention: शार्दुल ठाकूरची EXIT, अर्जुन, शमीची एंट्री! लखनौ सुपर जायंट्सने कोणाला ठेवलं कायम अन् कोणाला दाखवला बाहेरचा रस्ता?

IPL 2026 LSG Retentions: आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्स संघाने कोणाला रिलीज केलं आणि कोणाला कायम ठेवलं आहे? जाणून…

shardul thakur
Shardul Thakur: पलटनमध्ये येताच शार्दुलच्या नावे मोठा विक्रम! IPL इतिहासात असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Shardul Thakur Record: शार्दुल ठाकूरच्या नावे मोठया विक्रमाची नोंद झाली आहे. मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटी रुपयात आपल्या संघात स्थान…

Shardul Thakur Sherfane Rutherford Traded To Mumbai Indians From LSG GT Ahead of IPL 2026
IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी ट्रेड डील! मराठमोळ्या शार्दुल ठाकूरसह ‘हा’ पॉवर हिटर ताफ्यात सामील

Mumbai Indians Trade: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२६च्या रिटेन्शनपूर्वी दोन मोठ्या ट्रेड डील केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी संघात दोन अष्टपैलू…

LSG trade Shardul Thakur to Mumbai Indians
मुंबई इंडियन्स अखेर अर्जून तेंडुलकरला निरोप देणार; एलएसजीच्या शार्दूल ठाकूरबरोबर होणार अदलाबदली

Arjun Tendulkar’s Mumbai Indians Exit: पाच वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. मात्र त्याला फारशी संधी मिळू शकली नाही.

Rohit Sharma Video Shock Pen Prank with Dhawal Kulkarni and Friends Goes Viral
“थांब आता तुला दाखवतो..”, रोहित शर्माने धवल कुलकर्णीसह केला प्रँक, शॉक लागणारा पेन दिला अन्…; VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma Prank Video: रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्रामवर नवीन व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या मित्राबरोबर प्रँक…

shardul thakur
जम्मू-काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी संघाची घोषणा; रहाणे, सर्फराजलाही स्थान

भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरला शुक्रवारी मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी तर, सर्फराज खान आणि अजिंक्य रहाणे यांनाही जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी करंडकच्या पहिल्या…

Shardul Thakur to captain Mumbai in Ranji Trophy New Season after Ajinkya Rahane steps down
अजिंक्य रहाणेनंतर ‘हा’ खेळाडू होणार मुंबईचा कर्णधार, पाहा कोणाला मिळाली जबाबदारी?

Mumbai Team New Captain: रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर नवा…

Shardul Thakur
Duleep Trophy 2025: शार्दुल ठाकूर बनला कर्णधार! श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाललाही मिळालं संघात स्थान

West Zone Squad For Duleep Trophy: येत्या काही दिवसात दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी वेस्ट झोन…

Shardul Thkur Statement on Shubman Gill About Bowling Changes and Giving Less Over Said Captain Decided That
IND vs ENG: “ते कर्णधार ठरवतो, माझ्या हातात…”, शार्दुल ठाकूरचं शुबमन गिलबाबत मोठं वक्तव्य; कमी षटकं देण्याविषयी काय म्हणाला?

Shardul Thakur on Shubman Gill: शार्दुल ठाकूरने कर्णधार शुबमन गिलबाबत दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Ben Duckett Sensational Diving Catch to Dismiss Shardul Thakur on Ben Stokes Bowling Video Viral
IND vs ENG: काय जबरदस्त झेल घेतलाय! लॉर्ड ठाकूरला बाद करण्यासाठी डकेटने हवेत झेप घेत टिपला अनपेक्षित कॅच; VIDEO व्हायरल

Shardul Thakur Wicket: मँचेस्टर कसोटीत लॉर्ड शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. पण बेन डकेटच्या कमालीच्या झेलवर तो…

ben duckett
IND vs ENG: क्रॉली- डकेटची दमदार सुरूवात! दुसऱ्या दिवशी काय घडलं? पाहा हायलाईट्स

IND vs ENG Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार मँचेस्टरमध्ये सुरू आहे. पाहा या सामन्यातील संपूर्ण अपडेट्स.

shardul thakur
IND vs IND A: मुंबईकर शार्दुल इंग्लंडमध्ये गरजला! दमदार शतक अन् गोलंदाजीत ४ विकेट्स; प्लेइंग ११ मध्ये जागा फिक्स?

Shardul Thakur Century In IND vs IND A Match: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने भारतीय संघाविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात…

संबंधित बातम्या