परभणी विभागामध्येच हिंगोली जिल्हा समाविष्ट असल्याने छत्रपती संभाजीनगर प्रदेशात सात विभाग येतात, अशी माहिती सिडको येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर; तसेच धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर परिणाम झाला.