scorecardresearch

सुनील तटकरे News

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
sunil tatkare 50 percent candidature for woman
आगामी निवडणुकीत महिला कार्यकर्त्यांना ५० टक्के उमेदवारी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा

डिसेंबरमध्ये पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाज पक्षापासून दूरावला होता, तो पुन्हा पक्षाबरोबर जोडला जात आहे, असा दावाही तटकरे…

Sunil Tatkare On Suraj Chavan
Sunil Tatkare : मारहाण प्रकरणानंतर महिन्यातच सूरज चव्हाणांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती का केली? सुनील तटकरे म्हणाले, “हा निर्णय…”

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

alibag political confusion in thakur family as members join ncp congress and shiv sena
अलिबागच्या ठाकूर कुटूंबाचे राजकारण नेमके कुठल्या दिशेने?

शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाकूर कुटूंबातील दोन भावंडांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची इच्छा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

Sunil Tatkare on Manikrao Kokate
माणिक कोकाटेंना मंत्रिमंडळातून नारळ मिळणार का ? सुनील तटकरे काय म्हणाले…

कोकाटे यांच्या बोलघेवडेपणाने सरकारसमोर अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना आता एकतर नारळ दिला जाईल किंवा खातेबदल होईल, अशी चर्चा राजकीय…

Sunil Tatkare on Manikrao Kokate
“सभागृहात घडलं ते निंदनीय”, माणिकराव कोकाटेंना प्रदेशाध्यक्ष तटकरेंकडून घरचा आहेर; म्हणाले, “सखोल चौकशी आवश्यक”

Sunil Tatkare on Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी आणि कालच्या पत्रकार परिषदेत केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका होत…

NCP state president Sunil Tatkare also had to face the wrath of the camp in Dharashiv city
छावाच्या कार्यकर्त्यांनी फाडले राष्ट्रवादीचे बॅनर; धाराशिवमध्येही तटकरेंना रोषाला सामोरे जावे लागले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धाराशिव शहरातही छावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Attempt to set fire to NCP office in Jalna
जालन्यात राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न; पेट्रोलची पेटती बाटली फेकली

भुतेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपण मुक्कामास असताना रविवारी रात्री अकराच्या सुमारास बाहेर मोठ्याने बोलण्याचा आणि…

ताज्या बातम्या