scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सुनील तटकरे Photos

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
Suraj Chavan
10 Photos
Suraj Chavan : छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांवर राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी

छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर अवघ्या महिन्याभरातच सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे.

14 Photos
शरद पवारांपासून सुनील तटकरेंपर्यंत; मविआ नेत्यांच्या प्रत्येक टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

संजय राऊतांनी शरद पवारांपासून सुनील तटकरेंपर्यंत मविआ नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…

ताज्या बातम्या