scorecardresearch

ठाणे News

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
In Kalyan, two smugglers were arrested with drugs worth sixty thousand rupees
कल्याणमध्ये साठ हजाराच्या अंमली पदार्थांसह दोन तस्कर अटकेत

कल्याण, डोंबिवली परिसरातील अंमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्याचे, या पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या…

In Kalyan East, during a raid at Satyam Ladies Bar in Vitthalwadi, cases were filed against 44 people
कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडीतील सत्यम महिला बारवरील छाप्यात ४४ जणांवर गुन्हे

या महिला सेवा बारमध्ये वाद्यवृंदाच्या तालावर सेवक महिला तोकडे कपडे घालून अश्लिल नृत्य करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला मिळाली…

Thane - Ghodbunder to Bhayandar tunnel and elevated road project cleared mumbai High Court has rejected L&T petition
ठाणे – घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा, आर्थिक निविदेविरोधातील एल. ॲण्ड टी.ची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

तथापि, निविदा प्रक्रियेतील अटींनुसार, निविदा उघडल्यानंतर आणि निर्णय कळवल्यानंतर बोलीची किंमत आठवड्यासाठी सीलबंद लिफाफ्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश…

thane zp lakes conservation
ठाणे ग्रामीण भागातील तलावांचे होणार संवर्धन, संवर्धनासाठी जिल्हा परिषद प्रकल्प व्यवस्थापन संस्था नेमणार

ठाणे शहर जसे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील इतिहासकालीन अनेक तलाव असल्याचे पाहायला मिळते.

property agent latest news in marathi
घरविक्री करणाऱ्या ४ हजार एजंट्सची नोंदणी रद्द! निकषात बसत नसल्याने महारेराची कारवाई

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५०…

ulhas river flood loksatta
उल्हास नदीच्या वहनक्षेत्रात बदल, पूरसंकट गडद; तातडीने मातीचा भराव काढण्याची वनशक्तीची मागणी

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीवर सुमारे ५० लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.

thane rte news in marathi
ठाणे : यंदा जिल्ह्यात आठ हजार विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेश निश्चित, आरटीई प्रवेशासाठी पालकांचा निरुत्साह

वंचित, दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली…

ghodbunder accident thane
ठाणे : घोडबंदर की अपघाताचे केंद्र, पाच महिन्यांत ३१ अपघात, सात जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक झपाट्याने वाढलेला भाग म्हणजे घोडबंदर पट्टा. गेल्याकाही वर्षांपासून घोडबंदर भागात नागरिकरण वाढत असताना हा भाग आता अपघाताचे…

Waldhuni River geo tagging
उल्हास, वालधुनीत मिसळणाऱ्या नाल्यांचे जीओ टॅगिंग; नाल्यांचे अक्षांश, रेखांशासह नाल्यांची संपूर्ण माहितीचे संकलन

ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे.

thane water supply loksatta news
ठाण्यात बुधवारी पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार…

ताज्या बातम्या