scorecardresearch

ठाणे News

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
thane Election Officials, Directs RPF Deployment at Railway Stations, Curb Cash Movement, lok sabha 2024, thane lok sabha, bhiwandi lok sabha, kalyan lok sabha, marathi news, election officer thane, rpf, Railway Protection Force, marathi news, thane news, election news,
रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत, रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश

मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च…

thane lok sabha marathi news, eknath shinde shivsena thane lok sabha,
ठाण्यात शिंदेसेनेकडून मिनाक्षी शिंदे यांना उमेदवारी ?

लोकसभा निवडणुकांच्या अखरेच्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असली तरी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे.

Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर, संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत, चाकूचा धाक दाखविल्याचा…

Three bookies arrested for betting on RCB vs Sunrisers Hyderabad IPL match
आरसीबी आणि सनरायझर्स हैदरबाद आयपीएल सामन्यात सट्टेबाजी, तीन बुकींना अटक

राॅयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली…

Rajan vichare, nomination,
राजन विचारे करणार २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी

ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळेल हे जवळपास स्पष्ट असले तरी पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याविषयी अजूनही संभ्रम…

Voting machines, Thane, Jitendra Awhad,
ठाण्यात भंगार अवस्थेत सापडली मतदान यंत्रे, मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील एका गोदामात मतदान ओळखपत्रांसह भंगार अवस्थेत मतदान यंत्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

thane bribery cases marathi news
ठाणे: लाचे प्रकरणी दीड वर्षात २७ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नाागिरी आणि सिंधुदूर्ग हा भाग येतो.

dombivli marathi news, ayregaon chawl demolished marathi news
डोंबिवलीत आयरेगावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त, मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई प्रीमियम स्टोरी

म्हात्रेनगर मधील राजाजी रस्ता भागातील मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे, शिव यादव या भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे.